शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या निलम गोरे यांच्या निषेधार्थ आंदोलन

यवतमाळ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने उपसभापती नीलम गोरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले. त्यामुळे गोरे यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. शिवसैनिकांनी आज सोमवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने  करत नीलम गोरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या निलम गोरे यांनी दिल्ली येथे मराठी साहित्य संमेलनात राजकीय व्यासपीठ नसतानाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निराधार आरोप केले. नीलम गोरे यांनी स्वतः चार वेळा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमुळे उपसभापती पद मिळाले. त्याच उद्धव ठाकरेंवर आरोप करणे हे केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे.  शिवसैनिकांनी निलम  गोरे यांना आत्मचिंतन करावे. जबाबदार पदावर असताना खोटी माहिती देऊन जनतेचीप्रशासनाची दिशाभूल करणे योग्य नाही, असेही निवेदनात नमूद केले आहे. पुसद शिवसेनेने नीलम गोरे यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या आंदोलनात शिवसेना तालुकाप्रमुख रवी पांडे, सहसंपर्कप्रमुख विकास जामकर, विधानसभा संघटक विजय बाबर, शहरप्रमुख हरीश गुरु, ॲड. वीरेंद्र राजे, तालुका संघटक मोहन विश्वकर्मा, रवी बहादुरे, पप्पू ठाकूर, उपजिल्हा संघटक सूर्यकांत भोने, शंकर माटे, निखिल दशरथे, विजय आलोने, सय्यद गासूद्दीन, गजानन फुलाते, तालुका महिला आघाडी प्रमुख मालती मिश्रा, अश्विनी वीरेंद्र राजे, अनिता बहादुरे, विद्या पोहरकर, माया दिगंबर फरकाडे, रेणू विनायक वानखेडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments