थेलेसिमिया रुग्णांसाठी मोफत तपासणी व निदान शिबिर



यवतमाळ : सत चिकित्सा प्रसारक मंडळ, नि:स्वार्थ सेवा फाउंडेशन आणि युवा जागर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने थेलेसिमिया रुग्णांसाठी मोफत तपासणी, निदान व उपचार शिबिर श्री सत्यसाई संजीवनी हॉस्पिटल वाघापूर यवतमाळ येथे सकाळीदहा वाजता येथेआयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर दि. 22 व 23 फेब्रुवारी 2025 रोजी होणार असून, यात निवड झालेल्या रुग्णांना मोफत बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन (अस्थिमज्जा प्रत्यारोपण) करण्याची संधी मिळणार आहे.

या शिबिरात मुंबईतील प्रख्यात हेमॅटोलॉजिस्ट व बालरोगतज्ज्ञ रुग्णांची तपासणी करून थेलेसिमियाचे निदान करतील. निवड झालेल्या रुग्णांचे मुंबईतील नामांकित रुग्णालयात निशुल्क बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन केले जाईल.

थेलेसिमिया आजार आणि उपचार:

थेलेसिमिया हा रक्ताचा गंभीर अनुवंशिक आजार आहे, ज्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी होते किंवा तयारच होत नाही. परिणामी, रुग्णांना दम लागणे, थकवा, श्वास घेण्यास त्रास, निस्तेज दिसणे यांसारख्या लक्षणांचा सामना करावा लागतो. अनेक रुग्णांना वारंवार रक्ताधान (ब्लड ट्रान्सफ्यूजन) घ्यावे लागते, तसेच त्यांचे आयुष्यही मर्यादित असते.

बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन हा थेलेसिमियावर एकमेव ठोस उपचार आहे, परंतु त्याचा खर्च प्रचंड असल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना तो परवडत नाही. सत चिकित्सा प्रसारक मंडळाच्या प्रयत्नांमुळे गरजू रुग्णांना मोफत प्रत्यारोपणाची संधी मिळणार आहे.

शिबिरातील तपासणी आणि सेवा:

वय वर्ष 1 ते 10 या गटातील रुग्ण व त्यांचे भाऊ-बहिणी यांची तपासणी आणि आवश्यक चाचण्या करण्यात येतील.जास्त वयोगटातील रुग्णांसाठी समुपदेशन व औषधोपचार मोफत उपलब्ध करून दिले जातील. निवड झालेल्या रुग्णांना मुंबईतील रुग्णालयात बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन मोफत करण्यात येईल.

रुग्ण व पालकांसाठी आवाहन:

थेलेसिमिया रुग्णांनी या मोफत तपासणी व उपचार शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थांतर्फे करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी सत चिकित्सा प्रसारक मंडळ 9673397810 निस्वार्थ सेवा फाउंडेशन 9130684338 आणि युवा जागर ट्रस्ट 8888902809 यांच्याशी संपर्क साधावा. 

Post a Comment

0 Comments