कुख्यात गुंड MPDA अंतर्गत स्थानबध्द

यवतमाळ : अवधुतवडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुंड साहेबराव पवार याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली.

साहेबराव उर्फ नितीन विश्राम उर्फ इसराम पवार वय ४१ वर्ष रा. अमराईपुरा, यवतमाळ असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे. त्याचा गुन्हेगारी अभिलेख सन २०१३ पासुन असल्याने व त्याचे विरुध्द खुनासह दरोडा, घातक शस्त्र बाळगणे, मारहाण करणे, संपत्तीचे नुकसान करणे, गंभीर जखमी करणे, जिवेमारण्याचा प्रयत्न करणे, असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे पो.स्टे अवधुतवाडी व लोहारा येथे नोंद असल्यामुळे व यवतमाळ शहर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. वेळोवेळी प्रतिबंधक कार्यवाही करुनही सार्वजनिक सुवेस्थेस बाधा पोहचवणारी कृत वाढत असल्याचे दिसुन आल्याने त्याच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याकरीता ठाणेदार पो.स्टे अवधुतवाडी यांनी MPDA अंतर्गत स्थानबध्द करणेबाबत प्रस्ताव तयार करुन  पोलीस अधिक्षक. यवतमाळ यांचे मार्फतीने जिल्हा दंडाधिकारी यांचे कडे सादर केला होता. सदर प्रस्तावास जिल्हा दंडाधिकारी यांनी मंजुरी दिली. दि. फेब्रुवारी रोजी स्थानबध्दतेचा आदेश पारीत केले होते. त्यामुळे आज भंडारा जिल्हा कारागृहात १ वर्षा करीता MPDA १९८१ (सुधारना २०१५) नुसार स्थानबध्द करण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही कुमार चिंता पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग दिनेश बैसाने यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नरेश रणधिर यांचे नेतृत्वात सपोनि धैर्यशिल घाडगे, सपोनि रोहीत चौधरी, पोलीस हवालदार विशाल भगत, बलराम शुक्ला, रुपेश ढोबळे, पो.कॉ मोहम्मद भगतवाले, प्रतिक नेवरे, रशिद शेख, योगेश चोपडे यांनी केली.

Post a Comment

0 Comments