ट्रेडींग अकाउंटच्या नावाखाली 13 लाखाने फसवणूक


यवतमाळ : मोबाईलवर व्हॉट्अप चाटींग करुन एका इसमाला ट्रेडींग अकाउंट काढण्याच्या नावाखाली इसमाची 13 लाख रुपयाने फसवणूक करण्यात आली. वणी शहरातील इसमासोबत हा प्रकार घडला अहे. या प्रकरणी वणी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

टीना मित्तल, अनिल कुमार गोयल, कस्टमर एक्झ्युकेटीव्ह अशी आरोपींची नावे आहे. किशोर ओंकार चौधरी वय 44 रा. गुलमोहर पार्क वणी असे फिर्यादीचे नाव आहे. आरोपीतांनी संगणमत करुन फिर्यादीचे मोबाईल वर व्हॉट्अप चाटींग केली. 50 रु. डीस्काउंड रेटवर आय. पी. ओ. सबस्क्राईब करुन देण्याचे आश्वासन दिले. त्याकरीता Barclays Securities या कंपनीचे प्रायमरी ट्रेडींग अकाउंट काढण्याकरीता त्याच मोबाईल अॅपवरुन Barclays (BG-SCII) डाउनलोड करण्यास सांगितले. फिर्यादी कडुन दिनांक 18/02/25 पासुन दिनांक 06/03/25 पर्यंत एकुण 13,67,000 घेवुन फिर्यादीची ऑनलाईन फसवणुक केली. याप्रकरणी किशोर चौधरी रा. गुलमोहर पार्क वणी यांच्या तक्रारीवरुन आरोपी विरुद्ध वणी अप क्र. 178/25 कलम 318(4) भान्यास सह कलम 66(ड) माहीती तंत्रज्ञान अधीनियम गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

 

Post a Comment

0 Comments