यवतमाळ : १९२७ ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. त्या सत्याग्रहाचे स्मृतीशिल्प नगरपरिषदेने दर्डा नगर येथे उभारले आहे. मात्र या ऐतिहासिक दिनाचे नगरपरिषदेला पूर्णपणे विस्मरण झाले असून शहरातील इतर शिल्पाकृती देखील दुर्लक्षित होत चालल्या आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या व बिरसा मुंडांच्या प्रतिमेवर आणि परिसरात प्रचंड धूळ-माती साचली असून परिसरात विजेचे खांब असतानाही त्या ठिकाणी सर्वत्र अंधार पसरलेला आहे. अशाच अवस्थेत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून पुतळ्यास अभिवादन केले. मात्र उपस्थित नागरिकांनी नगरपरिषदेच्या हलगर्जी कारभाराबद्दल तिव्र संताप व्यक्त करून नगरपरिषद प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे.
यवतमाळ शहरात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक, लोकनायक बापूजी अणे, बिरसा मुंडा, इंदिरा गांधी, वसंतराव नाईक, अहिल्याबाई होळकर, भगतसिंग,सुखदेव, राजगुरु हे क्रांतिकारक, संत गाडगे महाराज, हुतात्मा स्मारके, जयस्तंभ (आझाद मैदान) यासह अनेक महापुरुषांचे पुतळे चौकाचौकात आहेत. मात्र या पुतळ्यांची स्वच्छता आणि देखरेखीबाबत नगरपरिषद प्रशासनामध्ये कमालीची अनास्था आणि उदासीनता दिसून येत आहे. पुतळ्यावर आणि लगतच्या परिसरामध्ये पशु-पक्षांच्या विष्ठा आणि धुळ साचलेली आहे. शहरातील पुतळ्याची स्वच्छता, त्याचे सौंदर्यीकरण व दैनंदिन देखभाल करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही नगरपरिषदेची असताना स्वच्छतेचे कोणतेही नियोजन नगरपरिषदेकडे असल्याचे दिसून येत नाही. एवढेच नव्हे तर महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीला देखील पुतळ्यांची स्वच्छता केली जात नाही, हा त्या महापुरूषाचा अपमान असून नगरपरिषदेकडून एक प्रकारे पुतळ्याची विटंबनाच होत आहे, अशी जनसामान्याची भावना होत आहे. महामानवाचे कार्य व विचारधारेशी जनतेचे भावनिक नाते असून प्रशासन जनसामान्यांच्या भावनांशी खेळत आहे. असा वंचित बहुजन आघाडीचा स्पष्ट आरोप आहे.
नगरपरिषद प्रशासन पुतळ्यांची स्वच्छता व देखभाल करण्यास अकार्यक्षम असल्याचे लेखी कळविल्यास वंचित बहुजन आघाडी शहरातील सर्व पुतळ्यांची स्वतः पुढाकार घेऊन व
स्वखर्चाने स्वच्छता करण्याची जबाबदारी घेण्यास तयार असून वंचित हुजन आघाडीने नगरपरिषदेला २४ तासाचा अल्टिमेटम दिला आहे.
येत्या २४ तासात नगरपरिषद प्रशासनाने पुतळ्यांची/स्मारकाची स्वच्छता न केल्यास वंचित बहुजन आघाडी स्वतः स्वच्छता मोहीम हाती घेईल, व जातीय भावनेतून महामानवांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे यवतमाळ नगरपरिषद यांचेवर फौजदारीगुन्हा दाखल करेल.अशा आशयाचे निवेदन डॉ.नीरज वाघमारे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी,यवतमाळ यांचे नेतृत्वात नगरपरिषद प्रशासनास देण्यात आले आहे.
याप्रसंगी डॉ.नीरज वाघमारे- जिल्हाध्यक्ष, शिवदास कांबळे- जिल्हा महासचिव, विशाल पोले- जिल्हा उपाध्यक्ष, गजानन सावळे- शहराध्यक्ष, विलास वाघमारे- शहर उपाध्यक्ष, प्रमोद पाटील - शहर महासचिव, पुष्पाताई शिरसाट- महिला महासचिव, शोभना कोटंबे- अध्यक्ष मीनाताई रणीत- उपाध्यक्ष, भारतीताई सावते- सचिव, सुकेशनी खोब्रागडे- संघटक, निशा निमकर-सदस्य, नितेश पाटील-शाखाध्यक्ष, अरविंद दिवे, बाळासाहेब वीर,राहूल राऊत, विलास भवरे, रमेश मोहोड, गोवर्धन मनवर,कवडू बांगडकर, गजानन कोकाटे, गोलू शिरसाठ,सचिनभाऊ राऊत,स्वप्नील कोल्हे,संदीप भगत, अमन राऊत इत्यादी कार्यकर्ते हजर होते.
0 Comments