40 लाख घेवुन संचालक फरार; कमी व्याज दरात कर्जाचे आमिष

यवतमाळ : मायक्रो फायनास कंपनी स्थापन करुन शेतकऱ्यांना कमी व्याजदराचे आमिष दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली. फायनान्स कंपनीच्या संचालकाने 40 लाख रुपये घेऊन पोबारा केला आहे. या प्रकरणी दारव्हा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

 आरोपी प्रशांत रामचंद्र खरे रा. पाटोदा ता. चिखली जि. बुलडाणा याने सण 2024 मध्ये जय किसान मायक्रो फायनान्सच्या नावे संस्था स्थापन केली. दारव्हा शहरातील गजानन नगर भागात कार्यालय थाटले. तेथे शेतकऱ्यांना कमी व्याजदारात कर्ज मिळेल असे आमिष दाखवुन लोन प्रोसेसिंग फी, जी.एस.टी. व डाऊन पेमेंट च्या नावाखाली शेकडो शेतकऱ्यांकडुन लाखो रुपयाची लुबाडणुक केली. या शेतकऱ्यांना फेब्रुवारी अखेर पर्यंत पीक कर्ज मिळेल असे त्याने आमिष दाखविले होते. यासाठी प्रशांत खरे याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जाळ्यात ओढण्यासाठी आरोपी प्रविण मधुकर ऊके रा. दारव्हा ता. दारव्हा याची कमिशन एजंट म्हणुन नेमणुक केली होती. फेब्रुवारी महीना संपल्याने शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी तगादा लावला.  आरोपी प्रशांत खरे हा रातोरात लोण प्रोसेस करीता शेतकऱ्यांनी सादर केलेले कागदपत्रे व जमा केलेली रक्कम घेवुन पळुन गेला. शेतकऱ्यांना फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली. आतापर्यंत प्राप्त तक्रारीवरुन आरोपी प्रशांत खरे हा एकुण-160 शेतकऱ्यांची रोख 39 40,330/- रुपये (39 लाख 40 हजार 330 रुपये) घेवुन फरार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.  शेतकरी गणेश बंडु जाधव वय 49 वर्षे, रा. उचेगाव ता. दारव्हा यांचे तक्रारीवरुन आरोपी प्रशांत रामचंद्र खरे रा. पाटोदा ता. चिखली,  प्रविण मधुकर ऊके रा. दारव्हा यांचे विरुध्द दिनांक 09/03/2025 रोजी अपराध क्रमांक 141/2025 कलम 318 (4), 3(5) भारती न्याय संहिता-2023 अन्वये पोलीस स्टेशन दारव्हा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचा तपास कुमार चिंता, पोलीस अधिक्षक,  पियुष जगताप अपर पोलीस अधिक्षक, चिलुमुला रजनीकांत, सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभाग पोलीस अधिकारी, दारव्हा,  विलास कुलकर्णी पोलीस निरीक्षक ठाणेदार पोलीस स्टेशन दारव्हा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर कायंदे पोलीस स्टेशन दारव्हा पथक हे तपास करीत आहे.

Post a Comment

0 Comments