अन् धावत्या बसचे स्टेअरिंग फेल

चालकाच्या प्रसंगावधानाने दुर्घटना टळली

यवतमाळ : पुसद आगाराराची बस सातघरी येथून पुसदकडे परत येत होती. अशातच अचानक बसचे स्टेअरिंग फेल झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास काळी दौलत- पोखरी रस्त्यावर आश्रम शाळे जवळ घडली. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत रस्त्यालगत असलेल्या गोठे व‌ मातीच्या ढिगाऱ्यावर टाकल्याने सूदैवाने मोठी दुर्घटना टळली.

पुसद आगारातून मुलींना शाळेत नेण्यासाठी बस क्रमांक एम एच ४० एन ८९६० काळी दौलत सातघरी मार्गे माळवागद येथे जात होती. मात्र वाटेतच सातघरी जवळ विद्युत वाहिणीचे तार तुटलेल्या अवस्थेत होती. त्यामुळे चालकाने एसटी बस पूढे न नेता परत पुसदकडे परत घेतली. एसटीमध्ये केवळ महिला वाहक व चालक दोघेच होते. काळी दौलत कडे येत असताना बसस्टँड पासून काही अंतरावर आश्रम शाळेजवळ अचानक धावत्या एसटी बसचे स्टेअरींग फेल झाले. एसटी बस अनियंत्रित झाली. मात्र चालक आर डी झडके यांनी प्रसंगावधान राखून एसटीबस रस्त्याच्या कडेला असलेल्या गोठे व मातीच्या ढिगाऱ्यावर टाकल्याने एसटी बसची गती कमी होवून बस थांबली. यात कोणतीही दुखापत झाली नसून, मोठी दुर्घटना टळली.

चांगल्या बस देण्याची मागणी

सातघरी जवळ विद्युत वाहिणीचे तार तुटल्याने बस गावात न जाता परत आली. त्यामुळे या बस मध्ये एकाही विद्यार्थीनींनी प्रवास करता आला नाही. जर बस मध्ये शाळेचे विद्यार्थी असतांना दुर्घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण असा सवालही उपस्थित होत आहे. शाळकरी विद्यार्थ्यीनींना प्रवासासाठी चांगल्या एस टी बस देण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी, पालक, शिक्षक करीत आहे. 

Post a Comment

0 Comments