शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी धरणे आंदोलन

यवतमाळ : जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी न्याय हक्कासाठी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक चौकात धरणे आंदोलनाचे आयोजन ३ मार्च रोजी करण्यात आले आहे.

विदर्भातील शेतकरी हवलदिल झाला आहे. शेत मालाला भाव नाही व शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यात कापसाला एम एस पी अंतर्गत बंद झालेली कापूस खरेदी तात्काळ सुरू करण्यात यावी. रोखीचे पीक समजले जानारे सोयाबीनची बंद केलेली खरेदी शासनाने तात्काळ सुरू करण्यात यावी. चना, तुर इतर देशातून आयात न करता योग्य भाव द्यावा. तसेच पीक विमा व वीज शेतकऱ्यांना मोफत द्यावी. निवडणुकीपूर्व शेतकऱ्यांना शासनाने कर्जमाफीचे आश्वासन दिले. मात्र ते हवेत विरले आहे कर्जमाफी जाहीर करावी या मुख्य मागण्यांसाठी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या धरणे आंदोलनात यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, महिला काँग्रेस, काँग्रेस सेवा दल, युवक काँग्रेस, एन एस यु आय, काँग्रेसच्या सर्व आघाडी संघटनांचे पदाधिकारी, सहकार क्षेत्रातील विविध मान्यवर व काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल मानकर यांनी केलेले आहे.

Post a Comment

0 Comments