मुलांना घरात कोंडून महिला गेली आत्महत्या करायला : मी आत्महत्या करायला चालली

विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह

यवतमाळ : आजाराने त्रस्त असलेल्या एका महिलेने आपल्या मुलांना घरात कोंडून मी आत्महत्या करायला चाचली असे सांगून घरुन निघून गेली. नातेवाईकांनी शोधाशोध केली असता सदर महिलेचा विहिरीत मृतदेह आढळला. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे. ही घटना उमरखेड येथील इंदिरानगरात दिनांक ७ मार्च रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमरास घडली.
यशोदा गंगाराम गरड रा. इंदिरानगर उमरखेड असे मृतदेह आढळलेल्या महिलेचे नाव आहे. सदर महिला आजाराने त्रस्त झाली होती. त्यामुळे तिला ७ मार्च रोजी सायंकाळी वर्धा येथे उपचारासाठी नेण्यात येणार होते. सदर महिलेने आपल्या तिन्ही मुलांना आपल्या घरात कोंडून, मी विहिरीत जीव द्यायला चालली असे मुलांना सांगितले. महिलेच्या मोठ्या मुलीने आराध्या वय 7 वर्ष हिने तिच्या काकास फोन द्वारे ही माहिती कळविली. त्यानंतर महिलेच्या दिराने परिसरात शोध घेणे सुरू केले. अशातच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिसरात जुन्या विहिरीत महिलेचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह विहिरी बाहेर काढला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. पुढील तपास उमरखेड पोलीस करीत आहे.

Post a Comment

0 Comments