वणी येथील घटना, लाखो रुपयांचे नुकसान
यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील साई मंदिर परिसरातील नामांकित हॉटेल असलेल्या रसोई हॉटेलला आज मध्यरात्री दरम्यान भीषण आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण करून संपूर्ण हॉटेल कवेत घेतले. या आगीत हॉटेलमध्ये असलेले संपूर्ण साहित्य जळुन खाक झाले आहे. यामध्ये हॉटेल मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागल्या नंतर तेथील नागरिकांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. या घटनेचे गांभीर्य पाहून नगर परिषदच्या अग्निशमन दलाने लगेच घटनास्थळ गाठले. पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.
0 Comments