यवतमाळ : ग्रामीण हद्दीत एका
महिलेकडून अवैध देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळच्या पथकाने ही कारवाई केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि.
आज १० मार्च रोजी यवतमाळ ग्रामिण पोलीस
ठाण्याच्या हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगार व अउघड गुन्हे उघडकीस येण्याचे
दृष्टीने पेट्रोलींग करीत होते. अशातच एक महिला मोपेड
वाहनाने माळम्हसोला गावाकडून यवतमाळकडे येत असून, देशी बनावटीची पिस्टल असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती. त्यावरुन
मनदेव देवस्थानाजवळ सापळा रचून सदर वाहन थांबवून वाहनाच्या डिक्कीची झडती घेतली. त्यामधून एक देशी बनावटीची
लोखंडी पिस्टल व १ जिवंत काडतुस आढळले. पोलिसांनी १ देशी बनावटीची पिस्टल मॅग्झीनसह, १ जिवंत काडतुस, १ मोपेड असा एकुण १,०१,०००/- रू चा मुद्देमाल
जप्त केला. स्त्री आरोपीस पुढील कायदेशीर
कार्यवाही करीता ताब्यात घेतले,
मित्राने दिली पिस्टल
पोलिसांनी पंचासमक्ष पिस्टल बाबत स्त्री
आरोपीस विचारणा केली असता, सन २०१८ - २०१९ मध्ये विनय राठोड हा
तिच्या संपर्कात आला होता. त्यानंतर त्याच्या सोबत तिची मैत्री
झाली होती. तेव्हा त्याने तिला देशी पिस्टल दिल्याचे सांगितले.
तसेच काही दिवसांनंतर त्याचा खून झाल्यामुळे सदर देशी पिस्टल ही तिचेजवळ
ठेवून असल्याचे नमुद केले.
एलसीबीच्या पथकाने केली कारवाई
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस
निरीक्षक सतिश चवरे यांचे मार्गदर्शनात पोउपनि गजानन राजमल्लू, सफौ सै. साजिद, सफौ बंडू डांगे, पोहवा रूपेश पाली, पोहवा योगेश डगवार, पोहवा प्रशांत हेडाउ, पोशि आकाश सहारे, पोशि आकाश सुर्यवंशी, पोशि देवेंद्र होले, मपोहवा सरोज रोडगे, मपोना ममता देवतळे, चापोहवा योगेश टेकाम यांनी केली.
0 Comments