खुनाच्या गुन्ह्यातील फरार कैद्यास अटक


यवतमाळ : खूनाचे गुन्ह्यात कारावासात असलेला अमरावती कारागृहातील कैदी कोविडच्या काळात अभिवचन रजेवर आला होता. रजेचा कालावधी संपल्यानंतर तो कारागृहात न जाता फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर कैद्यास अटक केली असून् कारागृहात दाखल करण्यात आले.

सुहास अनिल खैरकार वय ३० वर्ष रा. अशोक नगर, पाटीपुरा यवतमाळ असे अटक केलेल्या कैद्याचे नाव आहे. दिनांक ९ मार्च रोजी वरीष्ठ तुरूंग अधिकारी अमरावती मध्यवर्ती कारागृह यांचे पत्र स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ येथे प्राप्त झाले होते. अमरावती मध्यवर्ती कारागृह येथुन कोविड अभिवचन रजेवरून फरार शिक्षा बंदी क. सी. ५५४७ सुहास अनिल खैरकार याचा शोध घ्यावा. तसेच मिळुन आल्यास त्यास अमरावती कारागृह येथे दाखल करावे असे आदेश दिले होते. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेवून महात्मा फुले चौक यवतमाळ येथे सुहास खैरकार याला ताब्यात घेतले.

तीन वर्षापासून होता फरार

सदर शिक्षा बंदी हा अमरावती कारागृहातुन कोविड अभिवचन रजेवरून दि. १८/०६/२०२२ पासुन फरार होता. दि.९/०३/२०२५ रोजी ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपीस खुनाचे गुन्ह्यात कारावासाची शिक्षा झाली असून त्यास अमरावती कारागृहात ठेवण्यात आलेले होते. फरार शिक्षा बंदी सी/५५४७ सुहास अनिल खैरकार वय ३० वर्ष रा. अशोक नगर, पाटीपुरा यवतमाळ यास पुढील कार्यवाही करीता मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे दाखल करण्यात आलेले आहे.

कारवाई करणारे पथक

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा सतिश चवरे यांच्या मार्गदर्शनात पोउपनि गजानन राजमल्लू, पोलीस अंमलदार सफौ सै. साजिद,  सफौ बंडू डांगे, पोहवा रुपेश पाली, पोहवा योगेश डगवार, पोशि आकाश सुर्यवंशी, पोशि देवेंद्र होले, चापोहवा योगेश टेकाम यांनी केली.

Post a Comment

0 Comments