दोन चोरट्यास अटक : आठ दुचाकी जप्त



यवतमाळ : घाटंजी शहरात दोन पांढुर्णा रोड लगत दोन चोरट्यांना अटक करण्यात आली. त्याच्याकडून आठ दुचाकी किंमत २ लाख ४० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्या आहे. एलसीबी व घाटंजी पोलिसांनी ही कारवाई केली.

नितीन कवडुजी लोंढे वय 33 वर्ष, आकाश रुपेश सोनटक्के वय 22 वर्ष दोन्ही रा. पांढुर्णा बु. ता. घांटजी अशी आरोपींची नावे आहे. दिनांक 12 मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व पोलीस स्टेशन घांटजी यांना गोपनिय माहीती मीळाली. दोन इसम पांढुर्णा रोड लगत मोसा घेवुन संशयित रीत्या फिरत आहे. त्यावरुन पोलिसांनी सापळा रचुन दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता वेगवेगळ्या ठिकाणावरुन 8 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आठ दुचाकी किंमत 2,40,000/रु चा मुददेमाल जप्त केला. पुढील तपास पोहवा राहुल खंडागळे पोलीस स्टेशन घांटजी हे करीत आहे.

सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक कुमार चिंता व अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, यांचे मार्गदर्शनात उपविभागिय पोलीस अधिकारी पांढरकवडा रामेश्वर वैजने, पोलीस निरीक्षक सतिष चवरे स्थागुशा, पो.नि. निलेश सुरडकर पो.स्टे घांटजी, सपोनि अजय कुमार वाढवे, पोहवा सुनिल खंडागळे, उल्हास कुरकुटे, सुधिर पांडे नापोका सुधिर पिदुरकर, निलेश निमकर, पोशी सलमान शेख, रजनिकांत मडावी सर्व स्थागुशा यवतमाळ पोलीस स्टेशन घांटजी येथील पोहवा राहुल खडागळे, मुकेश करपते, अंकुश बहाळे, पोका छंदक मनवर, नितेश छापेकर यांनी केली.

Post a Comment

0 Comments