प्रेयसीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत गेला; अन् खेळ खल्लास झाला : प्रेमप्रकरणातून ‘त्या’ युवकाची हत्या

यवतमाळ : शहरातील बोधड येथील युवक आपल्या प्रेसयी सोबत व्हिडीओ कॉलवर बोलत बोलत दुचाकीने घरून निघुन गेला होता. रात्रीच्या सुमारास वाघापूर परिसरातील मित्राच्या घरासमोरच युवकाच्या पाठीवर मारेक-यांनी शस्त्राने वार केले. तर खाली पडताच त्याच्या डोक्यावर दगड टाकला. प्रेमप्रकरणातून त्या युवकाची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोन संशयीतांना ताब्यात घेतले असले तरी वृत्त लिहेपर्यंत नेमके मारेकरी कोण याचा उलगडा झाला नाही.

शिष माणिकराव सोनोने वय  33 रा. प्रिया रेसिटंसी बोधड असे मृतकाचे नाव आहे. तर सुनिता माणिकराव सोनोने वय 54 वर्ष रा प्रिया रेसीडेन्सी, चौसाळारोड बोधड असे फिर्यादीचे नाव आहे. १७ मार्च रोजी लोहारा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. सुनिता सोनोने यांना मोठा आशिष मानीकराव सोनोने वय 34 वर्ष व लहान मुलगा परिक्षीत वय 31 वर्ष असे दोन मुल असून, एकञ राहतात. आशिषला पत्नी भुमीका सोनोने वय 32 वर्ष व कान्हा नामक 9 र्षाचा मुलगा आहे. त्याची पत्नी भुमीका ही मागील एक वर्षापासुन वेगळी राहते. आशिष हा दारु पिण्याच्या सवईचा असुन त्याचे वाघापुर येथील एका महिलेसोबत ब-याच दिवसांपासुन प्रेम संबंध आहे. त्यामुळे सुन भुमीका व मुलगा आशिष ह्याच्यात भांडण होत होते.  सदर भांडण व दारुमुळे भुमीका ही तिच्या आई वडीलासोबत सावरगाव येथे राहत होती. दि. 15 मार्च रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास आशिष व त्याच्या प्रेयसीचा मुलगा यांच्यात वाद झाला होता. त्याने जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आज आशिषची हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप , उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसने, लोहारा पोलीस ठाण्याच्या ठाणेदार यशोधरा मुनेश्वर व पोलीस कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक यांनी घटनास्थळ गाठले. आज सोमवारी सकाळी  पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. नुकताच लोहारा एमआयडीसी परिसरात एका युवकाचा खून झाला होता. या प्रकरणाची शाईवाढते न वाढत आज पुन्हा एका युवकाचा खून करण्यात आला. आठवड्याभरात शहरातील खुणाची दुसरी घटना आहे. पुढील तपास लोहारा पोलीस करीत आहे.

प्रेयसीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत गेला अन्...

दि. 17 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास आशिष हा प्रेयसीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत बोलत तो त्याची मोटर साईकलवर बसुन बाहेर गेला. तो रात्री उशिरा पर्यंन्त घरी परत आला नाही. दि. 17 मार्च रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास दिनेश सोनोने यानी आशिष सोनोने हा वाघापुर टेकडीजवळील काशीकर महाराज मठाजवळ पडुन आहे. त्याला कोणीतरी मारुन टाकले आहे. अशी माहीती मृतकाची आई सुनिता सोनोने यांना दिली.

मित्राच्या घरासमोर केला खुन  

या घटनेची माहिती मिळताच मृतकाची आई सुनिता सोनोने यांनी वाघापुर टेकडी येथील काशीकर महाराज मठाजवळ जावुन पाहीले. यावेळी मुलगा आशिष सोनोने हा त्याचा मित्र भाऊराव मनवर ह्याच्या घराच्या दरवाज्याच्या समोर रोडवर रक्तबंबाळ होवून रक्ताचे थारोळ्यात पडून होता. त्याच्या अंगावर भोसकल्याच्या जखमा होत्या. तोंडावर मोठे दगड टाकलेले होते. अंगावरील कपडे व त्याला पाहुन आशिषची ओळख पटली.

पाठीवर घाव अन डोक्यावर घातला दगड

दि. 17 मार्च रोजी रात्री 12.30 वाजता ते सकाळी 5 वाजताचे दरम्यान माझा मुलगा आशिष सोनोने याचा कोणीतरी अज्ञात इसमांनी कोणत्यातरी कारणावरुन धारदार शस्त्राने त्याचे पाठीवर वार केले. त्याचे अंगावर मोठे दगडा टाकुन गंभीर जखमी करुन त्याचा खुन केला. अज्ञात इसमांविरुद्ध कार्यवाही करण्यात यावी अशी फिर्याद सुनिता सोनोने यांनी लोहारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

 

Post a Comment

0 Comments