अफरोज खा तारीख खा वय 37 रा. चमन नगर, विनोद नारायण रोकडे वय वर्ष 55 रा. टोलिपुरा, अनिस खा तयब खा वय 36 रा. नबाबपूर, मोहम्मद इसराइल मोहम्मद युसुफ वय वर्ष 45 रा. माळीपुरा, विजय शंकर राऊत वय 59 रा. माळीपुरा असे जुगार खेळणा-यांची नावे आहे. नेर शहरातील माळीपुरा येथिल विजय राउत यांचे घरी वरच्या माळ्यावरील खोलीत काही ईसम 52 पत्याचा एक्का बादशाह नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती नेर पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर उपविभागीय अधिकारी तथा नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रोहित ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जुगारावर धाड टाकली. पोलिसांनी आरोपी अफरोज खा तारीख खा वय 37 राहणार चमन नगर, विनोद नारायण रोकडे वय वर्ष 55 राहणार टोलिपुरा, अनिस खा तयब खा वय 36 राहणार नवापूर मोहम्मद इसराइल मोहम्मद युसुफ वय वर्ष 45 राहणार माळीपुरा विजय शंकर राऊत वय 59 राहणार माळीपुरा यांना पकडले. यामध्ये आरोपीकडून दुचाकी एम एच 29 बी एन 29 14 अंदाजे किंमत 70 हजार रुपये नगदी , एम एच 29 ए यु चाळीस-पंचवीस किंमत अंदाजे 60 हजार रुपये, मोबाईल अंदाजे किंमत दहा हजार रुपये असा एकूण 1,60,200 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपविभागीय तथा नेर पोलिस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार रोहित ओहाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
The Menu of this blog is loading..........
0 Comments