नकली सोने विकणा-या टोळीतील आरोपीस अटक : हजारोंचा मुद्देमाल जप्त


यवतमाळ : खोदकाम करीत असतांना एक कीलो सोन्याचे नाणी मिळाले असून, विक्री करायचे आमिष दाखविण्यात आली. एका इसमाला बनावट सोने देवून त्याच्याकडून १० लाख रुपये घेवून पोबारा केला होता. या प्रकरणी आर्णी पोलिसांनी नकली सोने विकणा-या टोळीतील एका आरोपीला अटक केली. यापुर्वी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, हा तीसरा आरोपी आहे. पोलिसांनी  त्याच्या हिस्यावर आलेली ७० हजार रुपये रक्कम जप्त करण्यात आली.

अंकुश उर्फ पंकज बाबुसिंग राठोड वय ३४ वर्षे रा. पिंपळगांव (पारध) ता. पुसद असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी महेश रामेश्वर हाके वय २० वर्षे रा. शिरनाळ ता. चाकुर जि. लातुर यास आरोपी दिनेश चव्हाण याने सांगीतले की, त्याचे वडीलांना खोदकाम करीत असतांना एक कीलो सोन्याचे नाणी मीळाल्या आहेत. त्या विकण्यास मदत करा किंवा स्वतः विकत घ्यावे. त्यावरून फिर्यादीने आमीषामध्ये एक किलो सोन्याचा नाणी १० लाख रूपयामध्ये विकत घेण्यास तयारी दर्शवीली. त्यावरून दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोजी फिर्यादी १० लाख रूपये घेवून एक किलो सोन्याचे नाणी घेण्याकरीता आरोपीने बोलावील्या ठिकाणी आर्णी येथे आला. १० लाख रूपये दिल्यावर सोण्याच्या नाणी घेत असतांना अचानक एक झायलो गाडी आली. त्यामध्ये असलेल्या तोतया पोलीसांनी फिर्यादी ला धाकदपट करून आरोपी व रोख १० लाख रूपये घेवून पसार झाले. पोलीस स्टेशन आर्णी येथे अपराध क. ७१२/२०२४ कलम ३१८ (४), २०५,३ (५) भा.न्या.सं अन्वये दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयात आरोपी निष्पन्न करून यापुर्वी २ आरोपीताना अटक करण्यात आली आहे. दिनांक २८/०३/२०२५ रोजी आरोपी अंकुश उर्फ पंकज बाबुसिंग राठोड वय ३४ वर्षे रा. पिंपळगांव (पारध) ता. पुसद हा त्याचे गावात असल्याची गोपनिय माहीती मीळाल्याने पोलीस पथकाने त्याचा शोध घेवून आज रोजी अटक केली आहे. गून्हयात त्याचे हिस्सावर आलेली रक्कम रोख ७० हजार रूपये जप्त करण्यात आली आहे.

सदर कार्यवाही  कुमार चिंता पोलीस अधिक्षक यांचे आदेशाने पियुष जगताप अपर पोलीस अधिक्षक, चिलुमुला रजनिकांत. सहायक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा याचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील नाईक, सपोनि प्रशांत देशमुख पोहवा मनोज चव्हाण, पोकॉ आकाश गावंडे, पोकॉ आकाश पातूरकर यांनी केली.

Post a Comment

0 Comments