बौद्ध
अनुयायांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
यवतमाळ : बिहारमधील
बुद्धगया येथील महाबोधी महाविहार, जो
बौद्धांसाठी सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र मानला जातो. यवतमाळात दि. ३ मार्च रोजी मोठ्या प्रमाणावर
धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. हे आंदोलन महाबोधी या बौद्धांच्या
पवित्र स्थळावर असलेला अधिकार पुनर्स्थापित करण्यासाठी उभारले गेले आहे. अखिल
भारतीय भिकू संघ आणि बौद्ध उपासक संघटनांच्या नेतृत्वाखाली, सोमवार दि. ३ मार्च रोजी दुपारी १२
वाजता आझाद मैदान, यवतमाळ
येथे भव्य धरणे आंदोलन होईल. १८९५ मध्ये ब्रिटिश इंडियन पिनल कोड अंतर्गत
ब्राह्मणांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आले होते. त्या वेळी कोर्टाने
महाबोधी महाविहार बुद्धविहार म्हणून घोषित केला होता, परंतु त्यावर ब्राह्मण पंडितांचा ताबा
कायम ठेवला आहे. महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी १९९२ पासून बौद्ध भिक्षूंनी
अनेक आंदोलनांची सुरूवात केली होती.
मात्र त्यांना प्रस्थापित सरकारकडून
विरोधाचा सामना करावा लागला. १९४९ मध्ये पं. नेहरू यांच्या नेतृत्वात पारित केलेला
महाबोधी टेम्पल मॅनेजमेंट कमिटी ॲक्टही ब्राह्मणांच्या प्रभावाला विरोध करत असला
तरी त्याची अंमलबजावणी योग्य रितीने होऊ शकली नाही. देशभरातील बौद्ध भिक्षूंनी महाबोधी
महाविहारच्या ब्राह्मण पंढितांच्या ताब्यातून मुक्तता प्राप्त करण्यासाठी एकजूट
दर्शवली आहे. दि. १२ फेब्रुवारीपासून ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमच्या वतीने बुद्धगया
येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. यवतमाळमध्ये ३ मार्च रोजी होणाऱ्या धरणे
आंदोलनास मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळत आहे. संपूर्ण बुद्ध समुदाय आणि लोकशाहीवर
विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन बौद्ध संघटनांनी
केले आहे.
0 Comments