यवतमाळ : शहरातील आझाद मैदानात चोरीचे सोने घेऊन विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून पाच लाख रुपयाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. आज शुक्रवारी साडेतीन वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
अविनाश अमन जोगळेकर असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. यवतमाळ शहरामध्ये चोरी व घरफोड्याचे प्रमाण वाढले आहे. सदर गुन्हे उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर उभे आहे. पोलीस अधीक्षकांनी सदर गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना दिले होते. अशातच आज दिनांक २१ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनिय बातमीदारा कडून सराईत गुन्हेगार अविनाश अमन जोगळेकर हा चोरीतील सोने विकणेकरीता आझाद मैदान परीसरात थांबून असल्याची माहीती मिळाली होती. त्या वरुन सपोनि संतोष मनवर व पथकाने त्यास आझाद मैदान येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याजवळून त्यास १६.३० वा. च्या सुमारास ताब्यात घेतले. अंग झडती घेतली असता त्याचे पॅन्टचे असलेल्या खिशात एका पांढऱ्या रंगाच्या रुमालामध्ये सोन्याचे दागीने मिळून आले.
तिन गुन्ह्याची कबुली
सदर दागीन्यांबाबत अविनाश जोगळेकर यास कौशल्यपूर्ण विचारपुस केली. त्याने यवतमाळ शहरामध्ये १. पोलीस स्टेशन यवतमाळ शहर अ.प.क्र. २६/२०२५ कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४), भा.न्या.सं. , २. पोलीस स्टेशन यवतमाळ शहर अ.प.क्र. ४१/२०२४ कलम ४५४, ३८० भा.दं.वि., ३. पोलीस स्टेशन अवधुतवाडी अ.प.क्र. ५८२/२०२४ कलम ४५४, ४५७, ३८० भा.दं.वि. हे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी अविनाश अमन जोगळेकर याचे ताब्यातुन वरील गुन्हयांमध्ये चोरी गेलेले ५३ ग्रॅम ६७० मिली चा मुद्देमाल किंमत ४,७७,६६३/- जप्त करण्यात आला.
कारवाई करणारे पथक
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष मनवर, सफौ योगेश गटलेवार, पोहवा अजय डोळे, पोहवा विनोद राठोड, पोहवा प्रशांत हेडाऊ, पोहवा निलेश राठोड, पोहवा रितुराज मेडवे, पोशि आकाश सहारे, सुमित पालेकर, दिगंबर पिलावान सायबर सेल एक्स्पर्ट यांनी केली.
0 Comments