पारंपारीक नृत्यावर धरला पालकमंत्र्यानी ठेका : बंजारा होळी उत्सव
March 14, 2025
यवतमाळ : यवतमाळ शहर बंजारा होळी उत्सव
समितीद्वारा संत सेवालाल महाराज मैदान, राजीव नगर, वडगाव येथे आयोजित होळी उत्सव व स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री
संजय राठोड व सौ. शीतलताई राठोड उपस्थित होत्या. यावेळी पारंपारीक नृत्यावर
ना. संजय राठोड व शीतलताई राठोड यांनी ठेका धरला.
वैभवशाली संस्कृती आणि परंपरेचा वारसदार
असणारा निसर्गप्रेमी बंजारा समाज होळी उत्सव नेहमीच आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी
करत आला आहे. आज देखील परंपरागत लेंगी नृत्य सादर करुन रंगोत्सवाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विविध
क्षेत्रात कार्य करणारे मान्यवर, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित
होते. या प्रसंगी ना. संजय राठोड यांनी सर्वांशी संवाद साधला.
तसेच रंगोत्सव कार्यक्रमात सहभागी होऊन सर्वांना होळी उत्सवाच्या
शुभेच्छा दिल्या.
0 Comments