दोन युवकावर केला प्राणघातक हल्ला, दुचाकी व कार केली चोरी
शिवम प्रेमदास राठोड वय १९ वर्ष रा. एम.
आय. डी. सी. लोहारा, वंश संजय कोटेकर वय १९ वर्ष रा. मुंगसाजी
नगर, लोहारा अशी आरोपींची नावे आहे. दिनांक १० मार्च रोजी फिर्यादी कमलेश सुर्यभान वाठोरे
रा. कोलाम पोड लोहारा यांनी पोलीस स्टेशन लोहारा येथे तक्रार दिली. त्याचा साळा विनोद शंकर शिपलेकर यास एस. के. बार च्या मागे मोकळ्या
जागेत कोणीतरी अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने वार करुन खुन केला आहे. फिर्यादीच्या
तक्रारी वरुन पोलीस स्टेशन लोहारा अ. प. क्र. ९८/२०२५
कलम १०३ (१) भा.न्या.स. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हयाचे गांर्भीय लक्षात घेवुन पोलीस
अधिक्षक साहेब यांनी गुन्हा उघडकीस आणुन आरोपीचा शोध घेवुन आरोपी अटक करण्याचे आदेश
स्थानिक गुन्हे शाखा यांना देण्यात आले. त्यावरुन घटनास्थळाच्या आजुबाजच्या परीसरातील
सिसिटीव्ही फुटेज व तांत्रीक बाबींचे संकलन करण्यात आले या सर्व तांत्रीक बाबींवरुन
व मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन गुन्हयातील आरोपी शिवम प्रेमदास राठोड वय १९ वर्ष रा.
एम. आय. डी. सी. लोहारा, वंश संजय कोटेकर वय १९ वर्ष रा. मुंगसाजी नगर, लोहारा असल्याचे निष्पण झाले. सदरचे आरोपी हे चोरीची चारचाकी वाहन
क्र. एम.एच. २९ जे. ३०९ मारुती ८०० घेवुन नेर रोड वरील येलगुंडा परीसरात लपुन असल्याची
गोपनिय माहीती सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर यांना मिळाली होती. त्यावरुन आरोपीचा शोध
घेतला. दोन्ही आरोपी पोलीसांना पाहुन चारचाकी वाहणाने नेर रोडने
पळुन जात असतांना आरोपीच्या वाहनाचा पाठलाग करुन दोन्ही आरोपी ताब्यात घेण्यात आले.
दोन्ही आरोपींची चौकशी केली असता त्यांनी दि. ९ मार्च रोजी रात्रीचे सुमारस एस. कुमार बार मध्ये एका
ईसमास बरोबर वाद करुण बारच्या बाहेर आल्यानंतर त्यास चाकु मारुन गंभीर जखमी
केले. तसेच त्यानंतर पुढे काही अंतरावर जावुन मृतक विनोद शिपलेकर याच्याशी वाद करुण त्यास चाकुने वार करुन जिवे मारल्याची कबुली
दिली.
पसार होण्यासाठी चोरली कार
सदर गुन्हे करणे करीता एक दुचाकी वाहन
व घटनास्थळावरुन पळून जाणे करीता एक चारचाकी वाहण चोरी केल्याची कबुली दिली. दोन्ही
आरोपीतांकडुन एकुण 55.000/- चा मुददेमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपीतांना पुढिल कारवाई करीता पोलीस स्टेशन
लोहारा यांच्या ताब्यात देण्यात आले.
एलसीबीच्या पथकाने केली कारवाई
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार
चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप,
उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने, स्थानिक गुन्हे शाखेचे
पोलीस निरीक्षक सतिश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक
पोलीस निरीक्षक संतोष मनवर, सफौ योगेश गटलेवार, पोहवा अजय डोळे, पोहवा विनोद राठोड, पोहवा प्रशांत हेडाऊ, पोहवा निलेश राठोड, पोहवा कविश पाळेकर, पोहवा रितुराज मेडवे,
पोशि दिगांबर पिलावन, पोशि आकाश सहारे यांनी केली.
0 Comments