शेतक-यांसाठी शिवसेना रस्त्यावर

 


यवतमाळ : शेती मालाला हमी भाव द्यावा, नाफेडच्या वतीने खरेदी करावी , वीरज जोडण्या कराव्या यासह विविध मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उबाठा रस्त्यावर उतरली आहे. नागपूर- तुळजापूर महामार्गावरील भांबराजा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मुख्शमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीपुर्वी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र ती हवेतच विरली आहे. सोयाबीन कापूस चना व तूर या पिकाला अत्यल्प भाव आहे. हमी दरामध्ये नाफेडचे केंद्र माल घेण्यास नकार देत आहे. शेतमालाला हमीभाव वाढवून द्यावा, शेतमाल नाफेडच्या वतीने खरेदी करावा, मागील पाच वर्षापासून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या विज जोडण्या तातडीने जोडाव्या कराव्या, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने मधून मंजूर झालेल्या सिंचन विहिरींचे बांधकामाचे अनुदान तातडीने शेतकऱ्यांना देण्यात यावे. संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, पिक विम्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी अशी मागणी करण्यात आली.

या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर इंगळे, माजी जिल्हाप्रमुख संतोष ढवळे, उपजिल्हाप्रमुख गजानन डोमाळे, तालुकाप्रमुख संजय रंगे, महिला आघाडीच्या विदर्भ संघटक सागरताई पुरी, कल्पना दरवई, अंजली गिरी, उपतालुकाप्रमुख चंद्रकांत उडाखे, संदीप सरोदे, गजानन पाटील, राजू धोटे, विभाग प्रमुख विष्णू राठोड, संतोष चव्हाण, विकास पवार, दिनकर भवरे, अक्षय ठाकरे, संदीप मडवे, पंडित राठोड, विशाल तिजारे, अनिल डिवरे, प्रमोद भारती यांचे सह शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments