ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

यवतमाळ : भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना आज सकाळी सात वाजताच्या सुमारास सवना ते गुंज मार्गावर घडली.

लखन देवराव जटाळे वय 24 वर्ष राहणार पिंपळगाव असे मृतकाचे नाव आहे. एका अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील लखन हा युवक त्याच्या भाऊ नितेश याला नॅचरल शुगर कारखान्यात सोडण्यासाठी गेला होता. परंतु परतीच्या प्रवासामध्ये नॅचरल शुगर कारखान्या जवळच त्याला ट्रॅक्टर चालकाने निष्काळजीपणाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात 'लखन ' हा तरुण जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच महागाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी संशयित ट्रक्टर ताब्यात घेतला. नातेवाईकांनी पोलिसात तक्रार केली. सवना येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. पुढील तपास महागाव पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक धनराज निळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Post a Comment

0 Comments