ब्रेकींग न्युज : भावानेच केली लहान भावाची हत्या

यवतमाळ : जिल्ह्यात खुनाचे सुत्र सुरु सुरू असून, सतत होणा-या गुन्हेगारांच्या घटनांनी जिल्हा हादरला आहे. मोठ्या भावानेच लहान भावाची हत्या केली. ही घटना खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या शेंबाळपिंप्री येथे शुक्रवार दिनांक २८ मार्च रोजी रात्री ८.३० ते ९ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने शेंबाळपिंप्री येथे खळबळ उडाली आहे. या घटनेतील आरोपी फरार असून, पोलीस त्याच्या शोधात आहेत.

दिनेश जयवंत शिरपुले वय २१ रा. शेंबाळपिंप्री असे मृतकाचे नाव आहे. तर मनिष जयवंत शिरपुले वय २३  रा शेंबाळपिंप्री असे आरोपीचे नाव आहे मृतक व आरोपी हे सख्खे भाउ आहेत. मनिषने घेतलेली दुचाकी दुरुस्त करुन दिनेश हा वापरत होता. सदर दुचाकीवरुन त्याच्यात वाद होत होते. दरम्यान शुक्रवारी रात्री शेंबाळपिंप्री येथे कार्यक्रम असल्याने गावातील नागरिक कार्यक्रमाला गेले होते. अशातच रात्री ८.३० ते ९ वाजताच्या सुमारास त्या दोघा वामध्ये वाद झाला. यावेळी झोपडपट्टी परिसरात असलेल्या घराच्या अंगणात आरोपी मनिषने मृतक दिनेश याला जमिनीवर खाली पाडले. त्यानंतर फावड्याने डोक्यावर घाव घालुन दिनेशची निघृण हत्या केली. लहान भावाची हत्या करुन आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. कार्यक्रमावरून कुटुंबातील अन्य सदस्य घरी परत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार देविदास पाटील व पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु आहे.

Post a Comment

0 Comments