देशी कट्ट्यासह काडतूस जप्त, युवकास अटक

यवतमाळ : पुसद शहरातील वाशिम रोडवरील पेट्रोलपंप जवळ एका युवकाच्या ताब्यातून देशी कट्ट्यासह दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. ही कारवाई वसंतनगर पोलिसांनी रविवारी केली.

देव दिलीप श्रीरामे वय २० वर्षे रा. शिवाजी वार्ड, पुसद असे आरोपीचे नावे आहे. दि. २ मार्च रोजी पोलीस स्टेशन वसंतनगर, पुसद हद्दीतील वाशिम रोडवरील पेट्रोल पंपासमोर एक युवक देशी कट्अ घेवून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोलीस उपनिरीक्षक योगेश जाधव व त्यांचे पथकाने सापळा रचुन आरोपी देव श्रीरामे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. याप्रकरणी आरोपीवर कलम 3, 25 भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंद सदर करण्यात आला. सदरची कारवाई कुमार चिंता, पोलीस अधीक्षक, पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, हर्षवर्धन बी. जे., सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, पुसद यांचे मार्गदर्शनात सतीश जाधव, पोलीस निरीक्षक, पो.स्टे. वसंतनगर, पुसद, पोलीस उपनिरीक्षक योगेश जाधव, अशोक चव्हाण, मुन्ना आडे, सतीश शिंदे व संजय पवार यांनी केली.

 

Post a Comment

0 Comments