मल्हारराव होळकर यांची जयंती : ३३३ दिवे लावून दीपोत्सव साजरा करणार

यवतमाळ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे गुरुपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना राज्यकारभार करण्याचे धडे देणारे श्रीमंत मल्हारराव होळकर यांची ३३२ वी जयंती ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्धी वर्षात येणारी विशेष जयंती असून त्या निमित्ताने ३३२ दिवे मल्हारराव होळकर यांच्यासाठी व एक दिवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या साठी असे ३३३ दिवे लावून दीपोत्सव व महाआरतीचे आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक म.फुले चौकयवतमाळ येथे रविवार १६ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आलेले आहे. यासाठी समाज बांधव भगिनींनी प्रत्येकाने एक दिवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्धी जन्मोत्सवा निमित्ताने श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या जयंती निमित्ताने प्रत्येकाने एक दिवा लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आव्हान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती यवतमाळ तर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments