यवतमाळ : घराला
आग लागुन घर जळून खाक झाले आहे. या आगीत जिवन आवश्यक वस्तू जळाल्या असून,
राखरांगोळी झाली आहे. ही घटना आज १ मार्च २०२५ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास राळेगाव येथील शिवाजी नगरमध्ये घडली. राळेगाव शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये
श्याम लक्ष्मण परचाके हे इसम वास्तव्यास आहे. आज १ मार्च
रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घराला आग लागली. आगीने
रौद्ररुप धारण करुन घराला कवेत घेतले. या आगीत संपुर्ण घर जळाले असून,
धान्य, कपडे, भांडे जळून खाक झाले आहे.
नागरिकांनी दिला मदतीचा हात
शिवाजी
नगरातील श्याम परचाके या इसमाचे घर जळुन खाक झाले आहे. त्यामुळे त्या
प्रभागातील नगरसेविका अश्विनी प्रदीप लोहकरे, छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती, राळेगाव, राजू दुधपोळे, अंकित कटारीया
यांनी सात हजार रुपये देवून मदतीचा हात
पुढे केला. धान्य, कपडे घेण्याकरिता तात्काळ मदत
करण्यात आली. यावेळी नगरसेवक मंगेश राऊत, प्रदिप लोहकरे माजी नगरसेवक,
अंकित कटारीया संचालक कृ.उ.बा.
राळेगाव, नितीन कोमेरवार, सैयद लियाकत अली, संजय
दुरबुडे, मनोज पेंदोर, अंकुश वड्डे, तलाठी
सौरभ तुमस्कर, अविनाश पेंदोर
सह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
0 Comments