यवतमाळ :
जिल्ह्यात नेमक चाललंय तरी का असा सवाल उपस्थित होत आहे. पुर्ववैमनस्यासह शुल्लक
कारणावरुन खुनाच्या घटना घउत आहे. दुचाकीच्या कारणावरुन भावानेच भावाची हत्या
केल्याची घटना शुक्रवारी रात्री शेंबाळपिंप्री येथे घडली. ही घटना ताजी असतांनाच शनिवारी
सायंकाळी ७ वाजातच्या सुमारास आर्णी शहरात खुन प्रकरणातील जामीनावर आलेल्या आरोपी
युवकावर शस्त्रांनी सपासप वार करुन निघृण हत्या करण्यात आली. गेल्यावर्षी झालेल्या
खुनाच्या घटनेचा मारेकर-यांनी बदला घेतल्याची चर्चा आर्णी शहरात सुरु होती.
जिल्ह्यात सतत घडलेत असलेल्या गुन्हेगारी घटनांनी जिल्हा हादरुन गेला आहे.
ओम गजानन बुटले वय २३ वर्ष रा. आर्णी असे
मृतकाचे नाव आहे. गेल्यावर्षी दुर्गादेवी विसर्जना
दरम्यान अजय तिघलवाड या युवकाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात मृतक ओम
बुटले व दत्ता शंकर वानखेडे हे आरोपी होते. गेल्या १५ दिवसापूर्वी ओम हा जामिनावर
आला होता. दरम्यान आज २९ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ओम हा पत्नी,
मुलगी यांना घेवून जात होता. आर्णी शहरातील महाळुंगी पॉईंट जवळ खरेदी
विक्री कार्यालया पुढे शस्त्र घेवून आलेल्या मारेक-यांनी सपासप वार करुन
ओमवर प्राणघातक हल्ला चढविला. यावेळी रक्ताच्या धारोळ्यात पडलेल्या ओम याला यवतमाळ
येथील शासकीय रुग्णालयात नेले होते. अशातच वाटेत मनदेव जवळ ओमचा मृत्यू झाला. त्याला सोडायला आलेले त्याचे मित्र अरबाज वसीम शेख वय वर्ष 21 रा. मुबारक नगर आर्णी, ओम सुरेश सवाई वय
वर्ष 19 आर्णी हे जखमी झाले आहे.
आर्णी ग्रामीण रुग्णालयात बघ्यांनी एकच गर्दी केली होती. या
घटनेची माहिती मिळताच आर्णी पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनिल नाईक व पोलीस पथाकाने
यांनी घटनास्थळ गाठले. या घटनेने आर्णी शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. आर्णी
पोलिसांनी तपासचक्रे फिरवून अवधूत सूर्यभान तिघलवाड वय वर्ष 55 रा. कोळवण याना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पुढील
तपास आर्णी पोलीस करीत आहे.
0 Comments