कुणाल ऊर्फ अजय प्रकाश बनसोड, वय 25 वर्ष, रा. इवळेश्वर ता. आर्णी असे
आरोपीचे नाव आहे. दिनांक 13 मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व पोलीस स्टेशन आर्णी हद्दीत
अवैध धंदयाविरुध्द कारवाई करणेकामी पेट्रोलींग करीत होते. इवळेश्वर येथे कुणाल ऊर्फ अजय प्रकाश बनसोड याचा नुकत्याच
वाढदिवशी साजरा केला. इवळेश्वर येथे सार्वजनीक रस्त्यावर त्याचे
बुलेटवर केक ठेवुन तलवारीने केक कापुन गावात दहशत निर्माण केली, या बाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यावरुन पोलिसांनी सदर युवकाला ताब्यात घेतले. त्याची
चौकशी करुन वाढदिवशी केक कापुण दहशत पसरविण्याकरीता वापरलेली धारदार
तलवार, फोटो काढण्याकरीता वापरलेला मोबाईल व बुलेट असा एकुण 1,61,000/- रु किमतीचा मुद्देमाल
जप्त केला. आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन आर्णी येथे भारतीय
हत्यार कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपीस पुढील कारवाईकामी पोलीस स्टेशन आर्णी यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिता व अपर पोलीस अधिक्षक पियुष
जगताप, पोलीस निरीक्षक सतिष
चवरे स्थागुशा यांचे मार्गदर्शनामध्ये सपोनि विजय महाले, पोलीस अंमलदार पोहेको बबलु चव्हाण, मिथुन जाधव, किशोर झेंडेकर, सोहेल मिर्झा, अमीत झेंडेकर, जितेंद्र चौधरी, अमित कुमरे यांनी केली.
0 Comments