यवतमाळ : समतापर्व प्रतिष्ठान यवतमाळ ची स्थापना २००५ रोजी यवतमाळ शहरांमध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी तथा सामाजिक न्याय विभागाचे विद्यमान प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केली. त्यांनी मोठया कष्टाने ही सामाजिक चळवळ उभी केली. सर्व समाजातील घटकांना एकत्रित आणून ११ एप्रिल महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती ते १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पर्वावर उदात्त हेतू समोर ठेऊन समतापर्व ही सामाजिक चळवळ उभारली. यवतमाळ शहरातील सर्व समाज बांधवांच्या उत्स्फूर्त सहभागाने, समतापर्व हा सामाजिक परिवर्तनाचा महोत्सव साजरा व्हावा या साठी सकारात्मक हेतूने हे कार्य केले आहे. या कार्यामध्ये २००५ पासून तर आजपर्यंत पर्यंत अथक परिश्रम घेऊन सातत्याने समतापर्वाचे आयोजनयशस्वी करणारे तत्कालीन आयोजन नियोजन समितीचे प्रमुख आणि त्यांना सहकार्य करणारे पदाधिकारी, महिला, भगिनी, युवक मित्र महत्त्वपूर्ण सदस्य तसेच पुढील काळातील अध्यक्ष, इंजि. दिपक नगराळे, ऍड रामदास राऊत, इंजि.मनोहर शहारे, अशोक वानखेडे, सिदार्थ भवरे, किशोर भगत यांच्या सह सर्व अध्यक्ष सचिव कार्यकारणीचे पदाधिकारी आयोजन नियोजन समितीचे सदस्य व ज्यांनी या समता पर्वामध्ये अत्यंत मेहनत केली सोबतच ही चळवळ गतिमान करण्याचा चंग मनाशी बांधून या कार्यक्रमांमध्ये सातत्य ठेवले अशा समस्त योगदान देणाऱ्या मान्यवरां प्रति कृतज्ञता व्यक्त करणारा ठराव दिनांक ३ मार्च २०२५ रोजी शासकीय विश्रामगृह या ठिकाणी झालेल्या सभेमध्ये घेण्यात आला. सदर प्रस्ताव प्रसिद्ध कवी हेमंत कांबळे यांनी मांडला. तर सर्व सभागृहांनी या ठरावाचे मनस्वी स्वागत केले. या ठरावाचे अनुमोदन अंकुश वाकडे यांनी केले. आतापर्यंत राबलेल्या व समता पर्वाला यशस्वी केले. त्या सर्वांचे कौतुक करता आले असे माधुरी वाळके यांनी व्यक्त केले. माझ्याकडे मुख्य संयोजकाची जबाबदारी असताना माझ्या कार्याकाळात असा ऐतिहासिक ठराव होणं हे फार आनंददायी असल्याची त्यांनी भावना व्यक्त केली. अध्यक्षस्थानी एड. सीमा तेलंग, मुख्य आयोजिका माधुरी वाळके, मार्गदर्शक प्रमोदिनी रामटेके, ऍड. रामदास राऊत, ऍड. जयसिंग चव्हाण, प्रा.डॉ.सरदार, जितेंद्र ढाणके, धीरज वाणी, उमेश मेश्राम, नामदेव थुल, जनार्दन मनवर, देवांगना मेश्राम, सुनिता कापसीकर, ज्योती जीवने, हर्षा बोडखे, रिना वानखडे, सुनिल बोरकर, दिपा बावनगडे, प्रिया अं . वाकडे, बावनगडे, भितकर, विशाखा खोब्रागडे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.
0 Comments