यवतमाळ : जिल्ह्यातील बाबुळगाव, कळंब, यवतमाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अॅल्युमीनियम तार चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. एलसीबीच्या पथकाने दोन अरोपींना अटक केली आहे. सदर आरोपींनी सात गुन्हे केल्याची कबुली दिली असून पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शेख सादिक शेख मोहम्मद साहब वय ४० वर्ष धंदा मजुरी रा. दुधाना, ता. नेर जि. यवतमाळ ह.मु. खापरी ता. घाटंजी, संतोष रामदास येडमे वय २६ वर्ष रा हिवरी ता.जि यवतमाळ अशक आरोपींची नावे आहे. दिनांक २२/०३/२०२५ रोजी एलसीबीचे पथक घरफोडी, जबरी चोरी, मोटर सायकल चोरी, विद्युत तार चोरी संबंधाने पेट्रोलींग करीत होते. अशातच ग्राम हिवरी येथे दोन इसमांनी अल्युमीनिअमचा तार चोरी करून पडके घराचे मागील बाजूस झाडाझुडुपात लपवून ठेवली आहे. अशी गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून हिवरी येथे संतोष येडमे याचे घराजवळ गेले असता आरोपी शेख सादिक शेख मोहम्मद साहब वय ४० वर्ष धंदा मजुरी रा. दुधाना, ता. नेर जि. यवतमाळ ह.मु. खापरी ता. घाटंजी, संतोष रामदास येडमे वय २६ वर्ष रा हिवरी ता.जि यवतमाळ मिळून आले. संतोष येडमे याचे घराची मागील बाजूस पाहणी केली असता झाडाझुडुपात वेगवेगळ्या ठिकाणी अॅल्युमिनीअम तार प्लास्टीकच्या पांढ-या चुंगडीत गुंडाळून मिळून आली.
सात गुन्ह्याची कबुली
आरोपींनी बाभुळगाव, कळंब, यवतमाळ शहर येथे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांचेकडून पो. स्टे बाभुळगाव येथे १) अप.क. ५३/२०२५ कलम ३०३ (२) भान्यासं २) अप.क. ७८/२०२५ कलम ३०३ (२) भान्यासं ३) अप.क. ७४/२०२५ कलम ३०३ (२) भान्यासं ४) अप.क. ३४/२०२५ कलम ३०३ (२) भान्यासं ५) अप.क. ९४/२०२५ कलम ३०३ (२) भान्यासं तसेच पो.स्टे कळंब येथे ६) अप.क. ४७/२०२५ कलम ३०३ (२) भान्यासं तसेच पो.स्टे यवतमाळ शहर येथे ७) अप.क. ८६२/२०२४ कलम १३६ भारतीय विद्युत अधिनियम अंतर्गत गुन्हे नोंद आहे.
चार लाखांचा मुद्देमाल जप्त
आरोपीकडून अॅल्युमिनीअम तार वजन १,१३६ किलो ग्रॅम ३०० रू प्रति किलो प्रमाणे एकुण किंमत ३,४०,८००/- रू चा अॅल्युमिनीअम तार गुन्ह्यात वापरलेली मो. सा किंमत ५०,०००/- रू व तार कापण्याकरीता वापरलेले कटर किंमत १,०००/- रू असा एकुण ३,९१,८००/- रू चा मुद्देमाल मिळुन आल्याने जप्त करण्यात आला. आरोपीतांना पुढील कारवाई करीता पो.स्टे बाभुळगाव यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
कारवाई करणारे पथक
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक, कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक, पियुष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश चवरे यांचे मार्गदर्शनात पोउपनि गजानन राजमल्लू, सफौ सै. साजिद, सफौ बंडू डांगे, पोहवा रूपेश पाली, पोहवा योगेश डगवार, पोहवा प्रशांत हेडाउ, पोशि आकाश सहारे, पोशि आकाश सुर्यवंशी, पोशि देवेंद्र होले, चापोहवा योगेश टेकाम, पोहवा कविश पाळेकर, पोशि दिगांबर पिलावन यांनी केली.
0 Comments