यवतमाळ - शेतकऱ्यांच्या चालू कर्जाची परतफेड ०% व्याजाने करण्याच्या मागणीस अखेर जिल्हा मध्यवर्ती बँकेने मान्यता दिली. जिल्ह्यातील वि.वि.का. स संस्थेच्या प्रतिनिधींनी यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर आमरण उपोषण सुरू केले होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे बॅंकेवर ९ कोटी रुपयंाचा भुर्दंड बसणार आहे. आता हे संपूर्ण कर्ज शुन्य टक्के व्याजदराने वसुल करण्यात येणार आहे.
सन २०२४-२०२५चे चालू कर्जाची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून सहा टक्के व्याजाने वसुल करणेबाबत ठराव करण्यात आला होता. त्यानंतर याबाबत मा. सहनिबंधक सहकारी संस्था यांना दि. २८ फेब्रुवारी २०२५ला लेखी निवेदन देण्यात अाले. तसेच मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ यांना सुध्दा २८ फेब्रुवारी २०२५ रोजी व १७ मार्च २०२५ रोजी निवेदन देण्यात आले. अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक मर्या. यवतमाळ यांना जर शुन्य टक्के व्याजदराने कर्ज वसुली झाली नाही तर १७ मार्च २०२५ रोजी आमरण उपोषणाला बसण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. १७ मार्चच्या निवेदनावर कुठलीच दखल मध्यवर्ती बँकेमार्फत घेण्यात न आल्यामुळे अखेर २६ मार्चला दुपारच्या सुमारास जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर जिल्ह्यातील संपूर्ण विविका स संस्थेचे प्रतिनिधी आमरण उपोषणास बसले या उपोषणाची दखल घेवून अखेर शेवटी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष यांनी निंबू शरबत देऊन उपोषण सोडविले.आणि शुन्य टक्के व्याजाने वसुली करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले असून सदर उपोषण बाभूळगाव तालुक्यातील राजकुमार पत्रे यांच्या पाठपूराव्यामुळे यशस्वी झाले. या उपोषणात प्रविण जुननकर, गजानन अजमिरे, डॉ.रमेश महानुर, मुकेशराव देशमुख, सुहासराव येंडे, विनायक हांडे, मोहन भोयर, घनश्याम वैद्य, मिलींद बोभाटे, भिमराव सोनाळे, राहुल शिरभाते, अशोक रोकडे, भानुदास टोणे, भानुदास बावणे, पांडुरंगजी लांडगे, सुनील मते, उपस्थित असलेल्या लोकांची नावे गजानन कडुकर , कोंबे साहेब , सिद्धेश्वर चौधरी,प्रवीणराव धोतिंग , संजय लोखंडे, नानाजी आगलावे,अरुण लांडे, निलेश लंगडे ,राम जाधव ,उपस्थित होते.
0 Comments