बस भिंतीवर धडकली : तीन कर्मचारी जखमी

 दारव्हा आगाराच्या कार्यशाळेतील घटना

यवतमाळ : वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही सहाय्यक यांत्रिक कर्मचार्‍यांने बस चालवीत थेट कार्यशाळेच्या भिंतीला धडक दिली. या अपघातात तीन कर्मचारी जखमी झाले झाले. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना दारव्हा आगार कार्यशाळेत शनिवार दिनांक १५ मार्च रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

दारव्हा आगारात बसचे मेटनन्सइतर दुरुस्तीची कामे करण्यात येते. यांत्रिक विभागातील सहाय्यक कर्मचार्‍यांना नियमानुसार बस चालविता येत नाही. मात्र एका सहाय्यक कर्मचार्‍यांने बस चालविली. अशातच बसवरील नियंत्रण सुटल्याने बस यांत्रिक विभागातील भिंतीवर धडकली. या घटनेत भिंत पडली असून तीन कर्मचारी जखमी झाले. घटनेनंतर जखमींना दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रकरण दडपल्याची चर्चा

सहाय्यक कर्मचा-याने बस चालवुन अपघात करणे हे प्रकरण गंभीर आहे. यामध्ये तात्काळ कारवाई करणे गरजेचे होते. मात्र थातूर मातूर कारवाई करुन प्रकरण दडपल्या जात असल्याची चर्चा आहे. कामचुकार पणा केल्याने एस. टी चे मोठे नुकसान झाले आहे. चालकाकडून मार्गावर अपघात झाल्यास त्यांचेवर तत्काळ कारवाई केली जाते. मग, या प्रकरणात दुजाभाव का? असा सवाल उपस्थित होत आहे.

चौकशी करुन कारवाई करु

बस अपघाताच्या संदर्भात प्रभारी वाहतूक नियंत्रक नरसिंग चव्हाण यांचेशी संपर्क साधला. असता त्यांनी या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करणार असल्याचे सांगीतले.

 

Post a Comment

0 Comments