अज्ञात वाहनाने महिलेला चिरडले


यवतमाळ : हॉटेलमध्ये कामाला जाणा-या महिलेला अज्ञात वाहनाने चिरडल्याने महिला ठार झाली. ही घटना आज सोमवार दिनांक 10 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास नागपूर- तूळजापूर मार्गावर जांब रोड ते गोधणी दरम्यान घडली.

निर्मला रामकृष्ण वाघमारे वय 60 वर्ष रा. किन्ही असे मृतक महिलेचे नाव आहे. वनवासी मारोती हॉटेलद्वारका ढाबा गोधणी या दोन ढाब्यावर ती काम करत होती. दिनांक 10 मार्च रोजी सकाळी 10 वाजता  द्वारका ढाबा गोधणी येथुन वनवासी मारोती जवळील हॉटेल मध्ये काम करण्याकरिता नागुपर-तुळजापुर हायवे रोडने पायदळ जात होती. अशातच जांब रोड ते गोधणी या गावच्या शिवारामध्ये नागुपर-तुळजापुर हायवे रोडवर मागुन येणाऱ्या भरधाव चारचाकी अज्ञात वाहनाने धडक दिली. सदर अपघातात निर्मला वाघमारे ह्या जागीच ठार झाल्या. या घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी मृतकाचा मुलगा विजय रामकृष्ण वाघमारे, वय-35 वर्ष, रा. किन्ही याच्या तक्रारीवरुन अवधूतवाडी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

 

Post a Comment

0 Comments