ऑटो चालकासह बालगुन्हेगारास अटक : आर्णी शहरातील घटना
रामचंद्र रमेश भोयर रा. भांबोरा व एक
बालगुन्हेगार असे आरोपीचे नाव आहे. घाटंजी तालुक्यातील एक १४ वर्षीय मुलगी आर्णी
येथील एका विद्यालयात आठव्या वर्गात शिक्षण घेत आहे. ती आपल्या गावावरून दररोज
ऑटोने आर्णी येथे शाळेत ये-जा करते. नेहमी प्रमाणे ११ मार्च रोजी सदर विद्यार्थीनी
ऑटोने आर्णी येथे शाळेत जात होती. अशातच तीचे डोके दुखत असल्याने ऑटोने मेडीकलकडे जाण्यासाठी
निघाली. यावेळी ऑटो चालकाने ऑटो मेडीकलकडे न नेता त्याच्या मित्रासह
माहूर रोड वरील उडान पुलाच्या बाजूला निर्जनस्थळी नेले. एका गाडीमध्ये
पिडीतेवर अत्याचाराचा प्रयत्न करुन विनयभंग केला. पिडीत विद्यार्थीनीने प्रतिकार केला असता वाहन चालकाने
पिडीत विद्यार्थीनीला शाळेत नेऊन सोडले.
पिडीत मुलीने आपल्या आई-वडीलासह आर्णी पोलीस ठाणे गाठून या घटनेची तक्रार दिली.
त्यावरुन पोलीस स्टेशन आर्णी येथे अपराध क्रमांक 192/25 कलम 74 75, 3 (५) बी एन एस सह कलम 8 12 पोक्सो अन्वय गुन्हा
नोंद केला. सदर गुन्ह्यात आरोपी ऑटो
चालकासह एका बालगुन्हेगारास अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आर्णी पोलीस करत आहे.
विद्यार्थीनीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
सतत अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असून, महिला व
मुलींची सुरक्षा धोक्यात आली आहे. शाळेत जाण्यासाठी निघालेल्या विद्यार्थीनीवर
अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकारामुळे पुन्हा एकदा विद्यार्थीनीच्या
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
0 Comments