यवतमाळ : जिल्ह्यातील जीरा मीरा शेतशिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली. या धाडीत सहा जणांना अटक केली असून हजारोचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रामहरी माधव भगत वय ५८ रा. करणवाडी ता. केळापुर, कवड्डु लक्ष्मण जुनघरे वय ४८ रा. बेलोरा ता. घाटंजी, उमेश सत्तु कुमरे वय २१ वर्षे रा. करंजी ता. केळापुर, ओम सुनील बुरेवार वय २४ रा. बेलोरा ता. घाटंजी, लक्ष्मणराव नथुजी मरापे वय ५९ रा वाघोली ता. केळापुर, मोहमंद खलीलखा पठाण वय ३० रा. करंजी ता. केळापुर अशी आरोपीचे नाव आहे. 2 मार्च रोजी पो. स्टे. पांढरकवडा हद्दीतील ग्राम जिरा मिरा गावाच्या बाजुला असलेल्या शेत शिवारालगतच्या जंगलामध्ये सार्वजनिक खुल्या जागेत काही इसम हे कोंबडयाच्या पायाला लोखंडी काती बांधुन दोन कोंबडयामध्ये झुंज लावुन त्यावर पैशांचे बाजीचा हारजीतचा खेळ खेळवित आहेत अशी खबर पथकाला मिळाली होती. त्यावरुन स्था.गु.शा. पथकाने जिरा मिरा बाजुला असलेल्या जंगल परसिरात जावुन छापा कारवाई केली.सदर कारवाई दरम्याण घटनास्थळा वरुन व ताब्यात घेतलेल्या इसमांचे झडतीमधुन झुंज लढवण्याकरीता वापरात आणलेले कोंबडे, काती व नगदी असा एकुण ९४,५८०/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने नमुद आरोपीतांविरुध्द पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही कुमार चिंता, पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ, सतिश चवरे, पोलीस निरीक्षक, स्था.गु. शा. यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात पोउपनि धनराज हाके, पोलीस अंमलदार सुनिल खंडागळे, उल्हास कुरकुटे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, निलेश निमकर, रजनीकांत मडावी, सलमान शेख, सर्व स्था.गु.शा. यवतमाळ यांनी केली.
0 Comments