पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन
बाभूळगाव येथील बसस्थानकाजवळील कोपरा मार्गावरील गुगलिया यांचे शेतात शंकरपट भरणार आहे. या निमित्ताने बाभूळगाव तालुका वासियांना सर्जा-राजाचा थर्रार अनुभवता येणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन दि. 15 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांचे हस्ते होणार असून यावेळी विशेष अतिथी म्हणून शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर लिंगनवार, जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, माजी जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, मध्यवर्ती सहकारी बँक संचाल अमन गावंडे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दौलतकार हे राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नेर अर्बनचे महाप्रबंधक प्रदीप झाडे, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष डाॅ. निरज वाघमारे, सामाजिक कार्यकर्ता इंदरचंद मुथा, पोलीस निरीक्षक लहुजी तावरे, प्रभारी तहसिलदार दिलीप बदकी, नायब तहसिलदार सैय्यद यामीन, बाजार समिती संचालिका आशा ठाकरे, सचिव विलास गायकवाड, वेणीचे माजी सरपंच विशाल डंभारे, माजी नगरसेवक उध्दवराव साबळे, यवतमाळ तालुका प्रमुख योगेश वर्मा, कळंब तालुकाप्रमुख अभिजीत पांडे, युवा उद्योजक अभय गुगलीया, आसेगाव देवी सरपंच सचिन चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत.
लावणी सम्राज्ञी हिंदवी पाटील यांचा कार्यक्रम
दि. 16 रोजी सायंकाळी 6.30 वाजता लावणी सम्राज्ञी हिंदवी पाटील यांचा बहारदार कार्यक्रम विशेष आकर्षण असणार आहे. शंकरपटामध्ये अ-गट प्रथम बक्षीस एक लाख एक हजार रू., ब-गट प्रथम बक्षीस 71 हजार रू., तालुका गट प्रथम बक्षीस 11 हजार रू. या प्रमाणे राहतील. तसेच तीनही गट मिळून एकुण 38 बक्षीसे राहणार असुन एकुण 7 लाख 51 हजाराची लूट होणार आहे. शंकरपटाचे आयोजन सचिन महल्ले मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. या शंकरपट, कृषिप्रदर्शनी, हिंदवी पाटील यांच्या बहारदार कार्यक्रमाचा आस्वाद तालुक्यातील गावक-यांनी घ्यावा असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष शेखर अर्जुने, उपाध्यक्ष स्वप्नील मुडे, सचिव चेतन गावंडे, सतिश भांगे, युवराज महानूर यांनी केले आहे.
0 Comments