उत्कृष्ट कामगिरी करणा-या महिला पोलिस अधिकारी, कर्मचा-यांचा सन्मान

 जागतिक महिला दिनाचे औचित्य : जिल्हा पोलीस दलाचे आयोजन

यवतमाळ : जिल्हा पोलीस विभागातर्फे पोलिस दलाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट कार्य करणा-या महिला पोलिस अधिकारी, महिला पोलिस अंमलदारांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी डॉ. वृषाली गिरीश माने यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. ऍड. सीमा तेलंगे यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. तर महागाव येथील उपविभागीय अधिकारी आयएएस अधिकारी लघीमा तिवारी यांनी शैक्षणिक मार्गदर्शन केले. पोलीस विभागामध्ये महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी करिता जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी सर्व महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रत्यक्ष फिल्डवर काम करताना सक्षमपणे काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी  उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार हजर होत्या. यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक सुशीला पवारकार्यालयीन महिला कर्मचारी हजर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक शुभांगी गुल्हाने यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन  लोहारा पोलीस ठाण्याच्या ठाणेदार पोलीस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर, पोलीस कल्याण शाखा प्रभारी अधिकारी अजित राठोड व त्यांची टीम, जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक ज्ञानदेव देवकते टीम यांनी केले होते.  भरोसा सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलिमा सातव यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments