सर्व सामान्य माणसाचे काम करणारा नेता म्हणून
शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ओळख आहे. त्यांनी सर्व सामान्य
मानसाला केंद्र बिंदु मानले आहे. मुख्यमंत्री असतांना ५०० शासन निर्णय घेतले आहे.
समाजातील सर्व घटकांसाठी त्यांनी काम केले आहे. राज्यात सर्व समाजाचे लोक
गुण्यागोविंदाने नांदत आहे. विविध समाजासाठी नविन महामंडळ तयार केले आहे. सामाजिक
, शैक्षणिक कामे केली आहे. शेतक-यांसाठी अनेक निर्णय घेतले आहे. शेतक-यांना कर्जमाफी
देण्यात येणार आहे. लोडशेडींग मुक्त कसे करता येईल यासाठी काम सुरु आहे. विधानसा
निवडणूकीच्या पुर्वी लाडक्या बहिणीसाठी योजनेची घोषणा केली. त्यामुळे हक्काचा भाउ
म्हणून नाते निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणूकीत जनतेने मतदान करुन महायुतीला
कौल दिला आहे. त्यामुळे मतदारांसह जनतेचे आभार मानण्यासाठी शिवसेना नेते तथा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यवतमाळात येणार आहे. ३ एप्रिल रोजी यवतमाळ येथील
समता मैदानात आभार सभा होणार आहे. या सभेला मंत्रीमंडळातील अनेक मंत्री उपस्थित
राहणार आहे अशी माहिती शिवसेना नेते तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड
यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही सभा यशस्वी होण्यासाठी शिवसेना पदाधिकारी,
शिवसैनिक कामाला लागले आहे. या आभार सभेला जनतेनी उपस्थित राहावे असे आवाहन
शिवसेना नेते तथा मृद व जलसंधारण मंत्री, पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
The Menu of this blog is loading..........
0 Comments