‘लिव इन रिलेशनशिप’ : दिराने केला वहिणीचा खून; मारेकरी आरोपी जेरबंद


यवतमाळ : गेल्या सात वर्षापासून वहिणी व दिर हे दोघे ‘लिव इन रिलेशनशिप’ मध्ये राहत होते. दरम्यान सात आठ दिवसापूर्वी ते नातेवाईकाकडे धार्मिक कार्यक्रम असल्याने गावी गेले होते. त्या ठिकाणी स्वयंपाक करीत असतांना कौटुंबिक वाद झाला होता. यावेळी दिराने सब्बलने मारून वहिणीचा खून केला. ही घटना आर्णी तालुक्यातील राणीधाणोरा येथे घडली.

तूळजा दत्ता पिलावन वय 38, रा. कोसदणी असे मृतक महिलेचे नाव आहे. तर लखन सुभाष पिलावन वय 45 रा. कोसदनी ता. आर्णी असे आरोपीचे नाव आहे. कोसदनी येथे मागिल 7 वर्षापासुन तूळजा पिलावनही आपला चूलत दिर लखन पिलावन याच्या सोबत नवर्‍याला सोडून लिव इन रिलेशन शिप मध्ये लहान मुलगा प्रशांत ला घेवून रहात होती. कोरोना मध्ये तुळजाचा नवरा मरण पावला होता. दरम्यान दि 26 फेब्रुवारी रोजी राणीधानोरा येथे नातेवाईकाकडे धार्मिक कार्यक्रमासाठी तुळजा, लखन हे गेले होते. दि 28 फेब्रुवारी ला राणी धानोरा येथे तुळजाही चूलिवर स्वयंपाक करित होती. यावेळी लखन व तुळजा यांच्यामध्ये कौटुंबिक वाद होवून शाब्दिक चकमक झाली. यावेळी रागाच्या भरात लखन याने लोखंडी सब्बल उचलून तूळजाच्या डोळ्यात मारला. त्यामुळे तुळजा रक्तबंबाळ झाली. यावेळी लखन नातेवाईकांनी तीला आर्णी येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंतानजक असल्याने प्रथमोपचार करुन यवतमाळ येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. जिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर नागपुर येथिल जि एम सी ला नेले. दरम्यान दि 6 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री तूळजाचा मृत्यू झाला. मृतकाचा मुलगा प्रशांत दत्ता पिलावन 21 याने आर्णी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. काका लखन पिलावन याने आई तुळजाला रागाच्या भरात सब्बलीने मारून जखमी केले असून, उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला असे तक्रारीत नमुद केले. या तक्रारीवरुन आर्णी पोलिसांनी आरोपी लखन पिलावन याच्या विरोधात भारतिय न्याय संहिता 103 (1) अंतर्गत गुन्हा नोंद केला. आरोपी लखन याला नागपूर येथील सरकारी मेडिकल कॉलेजमधून अटक केली. पुढील तपास आर्णी पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनिल नाईक यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरिक्षक स्वाति वानखडे व सहकारी करीत आहे.

आरोपीची कारागृहात रवानगी

वहिणीचा खून करणा-या आरोपी लखन याला आर्णी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर आर्णी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. सदर आरोपीला न्यायालयीन कोठडी सुणावली असून, त्याची यवतमाळ येथील जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.

Post a Comment

0 Comments