यवतमाळ : दोन महिला किराण्याने घेतलेल्या घरात
कुंटणखाना सुरु केला. या कुंटणखाण्यात महिलांना आणून त्याच्याकडून देहविक्री
करण्याचा धंदा सुरु होता. प्रतिष्ठीत कॉलिनीमध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर
पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत पोलिसांनी कुंटणखाना चालविणा-या दोन महिला, पिडीत
दोन महिला व एका पुरुष ग्राहकाला अटक केली.
तीन दिवसात दुसरी कार्यवाही
यवतमाळ शहराचे गुन्हे प्रकटीकरण पथकाची
सलग तीन दिवसांत दुसरी कार्यवाही करण्यात आली. अशा प्रकारचे लपुन छपुन चालणारे कुंटनखाने आणि त्यावर पैसे गमावणारे आंबट शौकीन
लोकांचे धाबे दणानले आहे. या कार्यवाही मुळे अनेक उध्दवस्त होणारे
सुखी संसार वाचणार आहे.
कारवाई करणारे पथक
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उप विभागीय पोलीस अधिकारी दिनेश वैसाने, यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव, गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सपोनि विकास दांडे, पोह रावसाहेब शेंडे, प्रदीप नाईकवाडे, गौरव ठाकरे, अभिषेक वानखेडे, पवन नांदेकर, रोहीणी वाकोडे, प्रदीप कुराडकर, चालक नितीन पंचबुध्दे यांनी केली.
0 Comments