यवतमाळ : रंगमंच व ललित कलांच्या संवर्धनार्थ कार्यरत संस्कार भारतीच्या यवतमाळ जिल्हा समितीच्या वतीने गुढीपाडव्याने प्रारंभ होणारे भारतीय नववर्ष उत्साहात साजरे होण्याच्या दृष्टीने निःशुल्क व खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. "मी अनुभवलेला महाकुंभ" या विषयावर 500 शब्द मर्यादेत लिहावयाच्या निबंधात महाकुंभात घडलेले भारतीय संस्कृतीचे दर्शन, महाकुंभाचे व्यवस्थापन, महाकुंभातील सामाजिक समरसता, महाकुंभाचे पर्यावरणीय, खगोलीय व आध्यात्मिक महत्त्व इत्यादी मुद्यांचा समावेश अपेक्षित आहे. स्पर्धकांनी हा निबंध ए फोर आकाराच्या कागदावर मराठी किंवा हिंदी भाषेत लिहून 9850369404, 8087997907, 9421474441 यापैकी एका क्रमांकावर 27 मार्चपूर्वी व्हाट्सअप करावा. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. संस्कार भारतीच्या 30 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या सांज पाडवा कार्यक्रमात बक्षीस वितरण करण्यात येईल. विजेत्यांना प्रथम बक्षीस 1001 रुपये रोख, द्वितीय :701 रुपये रोख व तृतीय : 501 रुपये रोख स्वरूपात देण्यात येतील. स्पर्धकांनी आपले निबंध सुवाच्य अक्षरात लिहून 27 मार्च पूर्वी दिलेल्या क्रमांकावर व्हाट्सअप करावे व मोठ्या संख्येत सहभागी व्हावे, असे आवाहन संस्कार भारती यवतमाळच्या वतीने करण्यात आले आहे.
The Menu of this blog is loading..........
0 Comments