सहा दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या, अग्निशस्त्रासंह ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त
दहा मिनिटात टाकला दरोडा
सदरचा संपुर्ण प्रकार अवघ्या १० मिटाचे
आत करुन दरोडेखोर हे त्यांचेकडील स्कॉप्रीओ वाहनाने पसार झाले. त्यानंतर घरातील फिर्यादी
आरती गणेश काळबांडे व त्यांच्या सासु पुष्पा काळबांडे यांनी स्वतःला सोडवुन आरडा ओरड
केल्यानंतर झालेल्या प्रकार शेजारी लोकांना माहित पडला. त्यावरुन शेजारी लोकांनी फिर्यादीचे पतीला सांगातांच
त्यांनी तात्काळ दारव्हा पोलीसांना सदरची माहिती दिली.
दरोडेखोरांचे वाहन सीसीटीव्हीत कैद
ठाणेदार दारव्हा कुलकणी यांनी झालेल्या प्रकाराबाबत वरिष्ठांना माहिती
देऊन, तात्काळ घटनास्थळ गाठले. आरोपीचा शोध घेण्याचे दृष्टिने घटनास्थळ परिसरातील सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी
केली. त्यामध्ये यातील अज्ञात आरोपीत हे एम. एच.२४ बी.एल ४२६२
या क्रमांकाचे पांढऱ्या रंगाचे स्कॉप्रीओ वाहनाने आल्याचे स्पष्ट झाले. सदरचे वाहन हे प्रथम पोलीसांची दिशाभूल
करणेकरीता दारव्हा शहरात भ्रमण करुन दिग्रस रोडने पुसदकडे गेल्याचे सी. सी. टी. व्ही
फुटेजवरुन दिसुन आल्याने पोलीस अधीक्षक यांनी जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन व शेजारी
जिल्हयाला नाकाबंदी करण्याचे आदेश दिले.
शेंबाळपिंप्री बस्थानकात वाहन टाकुन झाले पसार
यातील नमुद आरोपीत हे पुसद येथुन शेंबाळपिंप्री
मार्ग नांदेड येथे जाण्याचे प्रयत्नात असतांना शेंबाळपिंप्री येथे खंडाळा पोलीस हे
शेंबाळपिंप्री घाटात नमुद दरोड्यातील अरोपींचा व वाहनाचा शोध घेण्यासाठी पेट्रोलींग
करीत होते. अशातच पोलीस वाहनास पाहुन आरोपीतांचे
बाहन अतीशय वेगाने शेंबाळपिंप्रीचे दिशेने पळुन गेले. परंतु खंडाळा पोलीस स्टेशन पोलीसांनी
शेंचाळपिंप्री येथे अगोदरच नाकाबंदी लावुन ठेवली असल्याने दरोडेखोरांनी त्यांचे वाहन
शेंबाळपिंप्री बसस्थानकामध्ये टाकले असता दरोडेखोर हे बसस्थानकाचे खाली आवारामध्ये
वाहन सोडुन सदर दरोडेखोर हे मुद्देमाल घेऊन शेतशिवरामध्ये पळुन जात होते.
सिनेस्टाईल पाठलाग करुन अटक
खंडाळा पोलीसांनी नागरीकांचे मदतीने सिनेस्टाईल पाठलाग करुन गणेश शाम कोतुरवार, वय २५ वर्ष, रा रवि नगर कवठा नांदेड, कार्तीक रमेश
गुलगज, वय २८ वर्ष, रा. वाल्मीक नगर नांदेड, आदर्श देवासीग
बिंडला, वय २३ वर्ष, रा. आदर्श नगर नांदेड, महेश रामप्रसाद पिंपरने, वय २३ वर्ष, रा. नांदेड, मो मोबीन
मो जिलानी वय ३२ वर्ष, रा. लेबर कॉलनी नांदेड, अशरफ खान परवेज खान, वय २८ वर्ष, रा गणेश पेठ नांदेड अशा एकुण ६ आरोपीतांना अटक केली. त्याच्याकडून मुद्देमाल व त्यांचेकडील हत्यार
जप्त करण्यात आले. एक दरोडेखारे अम्मु ऊर्फ अमीर रा शास्त्रीनगर नांदेड
हा पळून गेला.
४३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
दरोडेखोरांकडुन २९९ ग्राम सोण्याचे दागीने, २ कि.लो चांदी, नगदी ६,८४,५००/- रुपये, ०२ गावठी (देशी) कट्टे, ०२ जिवंत काडतुस, ०१ स्कॉप्रीओ वाहन, ०२ मोबाईल असा एकूण ४२,८५,५००/- रु चा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
कारवाई करणारे पथक
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुश जगताप यांचे मार्गदर्शनात रजनीकांत चिलुमुला, सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविपोअ दारव्हा, हर्षवर्धन बी.जे. सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविपोअ पुसद, विलास कुलकर्णी पो. नि. पो.स्टे. दारव्हा, सपोनि देविदास पाटील ठाणेदार पो.स्टे. खंडाळा, पोउपनि काईदे पो.स्टे. खंडाळा, पो.स्टे. खंडाळा
येथील पोलीस अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
0 Comments