पोलीस ठाण्यात तक्रार : मिसींगची नोंद
: पत्नीचा शोध घेण्याची मागणी
यवतमाळ : जिल्ह्यातील एका तरुणाची धार्मिक
कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी गेलेल्या तरुणी सोबत ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर
प्रेमात झाल्यानंतर त्यांनी प्रेम विवाह करण्याचा निर्णय घेतला. एक मंदिरात जावुन
त्या दोघांनी विवाह विधी उरकविला. या प्रेमविवाहाची भनक तरुणीच्या कुटुंबियाला
लागताच त्यांनी तरुणाचे घर गाठले. प्रेमविवाह केलेल्या तरुणीला मारहाण करीत बळजबरीने
कारमधुन घेवून गेले. त्यामुळे फक्त नउ दिवसात या प्रेमविवाहाला ग्रहण लागले की काय
असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही. या प्रकारानंतर तरुणाने पोलीस ठाणे गाठून पत्नीला
मारहाण करुन जबरीने नेल्याची तक्रार दिली. परंतू पोलिसांनी मिसींगची नोंद केली
आहे.

दिग्रस पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या एका
गावातील ‘विनायक’ नामक ३२ वर्षीय तरुणाने गावात धार्मिक कार्यक्रम घेण्याच्या
उद्देशाने नंदुरबार जिल्ह्यातील एका तरुणीला निमंत्रण देण्यासाठी गावातील काही
भाविकांना घेवून गेला होता. प्रवचना दरम्यान त्या तरुण व
तरुणीची ओळख झाली. नंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांनी कुटुंबातील
सदस्यांना भनक लागु न देता एका मंदिरात जाऊन विवाह विधी उरकवला. मात्र नउ दिवसात प्रेमप्रकरणाची
तरुणीच्या कुटुंबियाला मिळताच तीला बळजबरीने घेवून गेल्याची घटना काल शनिवारी घडली.
दि. 6 मार्च 2025 रोजी तरुण व तरुणीचा विवाह दारव्हा तालुक्यातील डोलारी येथील जगदंबा मंदिरात पार पडला.
नऊ दिवसा नंतर या प्रेमविवाहाची भनक तरुणीच्या नातेवाईकांना लागली. दि. 15 मार्च रोजी सकाळी 8 वाजता तरुणाचे घरात घुसले. प्रेमविवाह
केलेल्या मुलीला मारहाण करीत चार चाकी वाहनांमध्ये घेऊन गेले. सदर प्रकरणाची
तक्रार दिग्रस पोलिसात देण्याकरिता ‘विनायक’ गेला. सकाळी 9 वाजल्यापासून त्याची
तक्रार घेण्यासाठी दिग्रस पोलीस टाळाटाळ करीत होते. विनायक याने वरिष्ठ पोलीस अधिका-यांना
सर्व प्रकार सांगुन दिग्रस पोलिसांना तक्रार घेण्यास सांगितले. परंतु दिग्रस पोलिसांनी
घटनेची तक्रार न घेता हरविल्याची तक्रार घेत असल्याचे त्या युवकाचे म्हणणे आहे. माझ्या
पत्नीला तिचा भाऊ आणि इतर पाच सहा जण घेऊन गेले. पत्नी सोबत काय होईल याचा नेम नाही.
त्यामुळे दिग्रस पोलिसांनी फिर्याद घेऊन पत्नीचा शोध घ्यावा अशी तक्रार दिग्रस पोलिसात
दिला. माझी पत्नी हरविली नसून तिला बळजवरीने घरात घुसून आई वडिलांसमोर तिला मारहाण
करीत बळजबरीने चारचाकी वाहनांमध्ये घेऊन गेले असे तक्रारीत म्हटले आहे. आता या प्रकरणात
दिग्रस पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments