यवतमाळ : येथील अवधूतवाडीतील श्रीराम मंदिरात गुढीपाडवा रविवार, 30 मार्च पासून रामनवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव साजरा होत आहे. ध्वजारोहण व गुढी उभारून या महोत्सवाला प्रारंभ होईल. या श्रीराम नवरात्रात रोज सकाळी 8 वाजता श्रीराम पंचायतन अभिषेक होणार आहे.
सोमवार, 31 मार्च रोजी सकाळी ७ ते ८ सामूहिक रामरक्षा पठणाचा कार्यक्रम होईल. संध्याकाळी 7 वाजता भक्ती महेश जोशी यांच्या भक्तीगीतांचा कार्यक्रम होईल. मंगळवार, 1 एप्रिल रोजी संध्याकाळी मनश्री दीक्षित यांचे कीर्तन होईल. बुधवार, 2 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजता छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. सविता मुळे यांचे कीर्तन होईल. गुरुवार, 3 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजता अमरावतीचे ख्यातनाम वक्ते शिवराय कुळकर्णी यांचे प्रवचन होईल. शुक्रवार, 4 एप्रिल व शनिवार, 5 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजता विठ्ठल काठोळे यांचे 'दासबोध' या विषयावर प्रवचन होईल. रविवार, 6 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता श्रीरामजन्म कीर्तन मनश्री दीक्षित सादर करतील. सोमवार, 7 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता काल्याचे भजन आणि दुपारी 12 वाजता महाप्रसाद होईल. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उपासना मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुनील लुले व सचिव अनिल कवीमंडन यांनी केले आहे.
0 Comments