यवतमाळ : महाबोधी विहार बुद्धगया येथील १९४९ चा अखिल भारतातल्या बौद्धांच्या विरोधी असलेला कायदा हा रद्दबातल करून त्या ऐवजी नवीन कायदा तयार करण्यात यावा. यामध्ये संपूर्ण समितीचे सदस्य हे बौद्ध असतील कोणताही ब्राह्मण पंडित त्यात सदस्य असणार नाही, शिवाय या समितीचा अध्यक्ष सुद्धा बौद्धच असावा जेणेकरून बौद्धांचे महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात येईल. या प्रमुख मागणीला घेऊन मागील ४५ दिवसांपासून महाबोधी विहार बुद्धगया येथे अखिल भारतीय भिक्षु संघाचे तीव्र आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनाच्या समर्थनार्थ मागील २५ दिवसांपासून अखिल भारतीय भिक्षु संघ यवतमाळच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन निदर्शने सुरू आहे. यामध्ये रोज शहरातील व शहराच्या आजूबाजूच्या परिसरातील एक बुद्ध विहार समिती महामहीम राष्ट्रपती महोदया यांचे नावाने यवतमाळ जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन सादर करीत आहे. तसेच बिहार सरकारच्या पोर्टलवर सुद्धा रोजचे निवेदन पाठविणे सुरू आहे.
आज धरणे आंदोलन सुरू असताना आंदोलनाचे संयोजक व भिक्षु संघाचे प्रतिनिधी यांनी येणाऱ्या ७ एप्रिल रोजी यवतमाळात महाशांती मार्च होणार हे घोषित केले. या शांती मार्चमध्ये लाखो बौद्ध अनुयायी व अनुसूचित जाती - जमाती, ओबीसी बांधवांसह मोठा जनसैलाब रस्त्यावर उतरणार आहे, हे सुद्धा सांगितले. यावेळी विविध ओबीसी संघटनांचे प्रमुख या ठिकाणी आले व त्यांनी महाबोधिमुक्ती आंदोलनाला समर्थन देत, यवतमाळात होऊ घातलेल्या शांती मार्चला आपले समर्थन व सहकार्य जाहीर केले.
यावेळी, प्रदीप वादाफडे, ओबीसी आरक्षण परिषद, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, प्रकाश फेंडर अध्यक्ष यवतमाळ जिल्हा, रमेश ठाकरे सचिव यवतमाळ जिल्हा, राजू पोटे अध्यक्ष कळंब तालुका, अशोक तिखे अध्यक्ष माळी महासंघ यवतमाळ जिल्हा, बाळासाहेब निवल अध्यक्ष शेतकरी संघटना यवतमाळ, मनोज पाचघरे कार्याध्यक्ष राजीव गांधी पंचायत राज तथा सोनाली मरघडे महिला अध्यक्षा शेतकरी संघटना यवतमाळ. इत्यादी ओबीसी बांधवांनी प्रत्यक्ष आपली उपस्थिती दर्शवत महाबोधी मुक्ती आंदोलनाला खुला पाठिंबा घोषित केला. यावेळी अखिल भारतीय भिक्षू संघाचे भंते राहुल थेरो, भंते अश्वजीत व भिक्षू संघातील मोठ्या प्रमाणात भिक्षुगण, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन यवतमाळ चे आयोजन नियोजनाचे मुख्य संयोजक, युवराज मेश्राम सुभाष डोंगरे, उमेश मेश्राम, धर्मराज गणवीर, कैलास बोरकर, लोखंडे, विश्वास बड़वाईक, एड. दिंडीलता कांबळे, श्रद्धा धवणे, गोविंद मेश्राम, मुरलीधर बडवाईक, विश्वनाथ अडकणे, विष्णू भितकर, जगन्नाथ शिरसाट, रवींद्र कांबळे, सुभाष मनवर, अरुण गोंडाने, तसेच मंगल मेश्राम, अभिषेक गायकवाड इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर, यवतमाळातील आंदोलनाचा २५ वा दिवस असताना, हजारो बौद्ध अनुयायी आजच्या धरणे आंदोलनात हातात पंचशीलचे ध्वज घेऊन, महाबोधी विहार मुक्त करो, च्या घोषणा देत आंदोलन करीत होते.
0 Comments