लाचखोर पोलीस उपनिरीक्षकासह हवालदाराला रंगेहात पकडले

 दिग्रस पोलीस ठाण्यात एससीबीचा ट्रॅप

यवतमाळ : पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्हयामध्ये मदत करुन त्यावर कार्यवाही न करण्यासाठी दोन हजार रुपये लाच घेणा-या दिग्रस पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकासह हवालदारास रंगेहात पकडले. लाच लुचपत प्रतिबंधीत विभागाच्या पथकाने आज दिग्रस येथे ही कारवाई केली.

नारायण धोंडबाजी लोंढे वय ५४ वर्ष, पद पोलीस उपनिरीक्षक नेमणुक पोलीस स्टेशन दिग्रस, दिलीप प्रल्हाद राठोड वय ४१ वर्ष पद पोलीस हवालदार ब. नं. १७४८ नेमणुक पोलीस स्टेशन दिग्रस अशी लाचखोरांची नावे आहे. एका ५५ वर्षीय इसमाने दि. ११ मार्च रोजी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ येथे पोलीस उपनिरीक्षक नारायण लोंढे, यांनी लाचेची मागणी केल्याची लेखी तकार दिली होती. सदर लेखी तकारी वरून लाच लुचपत प्रतिबंधीत विभागाच्या पथकाने दि. ११ मार्च रोजी पंचासमक्ष पडताळणी केली. यावेळी पिएसआय नारायण लोंढे यांनी स्वतः करीता तकारदार यांना त्यांचे विरुध्द पोलीस स्टेशन दिग्रस येथे दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्हयामध्ये मदत करुन त्यावर कार्यवाही न करण्याकरिता पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती दोन हजार रुपये लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केले. त्यावरून दि. ११ मार्च रोजी सापळा रचुन पिएसआय लोंढे यांनी पोलीस स्टेशन दिग्रस येथे स्वतः करीता रुपये दोन हजार रुपये लाच रक्कम स्विकारुन पोलीस हवालदार दिलीप राठोड यांना दिली. दोन्ही आरोपींना रंगेहात पकडण्यात आले आहे. पोलीस स्टेशन दिग्रस येथे सविस्तर गुन्हा दाखल करण्याची प्रकीया सुरू असुन सदर गुन्हयाचा तपास हा लाचलुचपत प्रतिबंधीत विभागाचे पोलीस निरीक्षक मनोज ओरके हे करित आहे.

सदरची कार्यवाही मारूती जगताप, पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र, अमरावती,  सचींद्र शिंदे, अपर पोलीस अधीक्षक, अमरावती, पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे, अॅन्टी करप्शन ब्युरो, यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज ओरके, पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट, पोलीस अंमलदार पोहवा अतुल मते, पोना सचिन भोयर, सुधीर कांबळे, राकेश सावसाकडे, पोकों भागवत पाटील व चालक पोकों अतुल नागमोते यांनी केली.

 

Post a Comment

0 Comments