धारदार शस्त्रासह तिघांना अटक

 

यवतमाळ : धारदार तलवार, गुप्ती व चाकु सोबत ठेवून लॉजमध्ये असलेल्या तिन युवकांना अटक करण्यात आली. उमरखेड पोलिस ठाण्याच्या डि.बी. पथकाने ही कारवाई केली.

शेख अहेफज शेख फिरोज, वय 19 वर्ष, बिलाल खान सलीम खान, वय 18 वर्ष, दोन्ही रा. अशोक नगर, यवतमाळ, सैयद मुदसिर सैयद मजिद वय 18 वर्ष, रा. झाकीर हुसेनबार्ड उमरखेड असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. दि. 8 मार्च रोजी उमरखेड पोलीस ठाण्याचे डि.बी. पथक उमरखेड हदीत पेट्रोलींग करीत होते. अशातच तिन इसम उमरखेड शहरातील राज डिलक्स या हॉटेल व लॉज अवैध तलवार व चाकू बाळगुण आहे अशी माहिती मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी लॉजमधून तीन युवकांना अटक केली. अंगझडती घेवून धारदार बटनचा चाकु, तलवार, गुप्ती आदि शस्त्र जप्त करण्यात आले. याप्रकरणी उमरखेड पोलिसांनी आरोपी विरुध्द अप क्र. 143/2025 शस्त्र अधिनीयम 1959 कलम 4/25 सह कलम 223 भा.न्या.स. अन्वये गुन्हा दाखल केला. सदर कारवाई यवतमाळ पोलीस अधिक्षक कुमार चिंता, अप्पर अधिक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड, पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि पांडुरंग शिदे पो.स्टे. उमरखेड डी बी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे, पोहेको संदिप ठाकुर, पोशि संघशिल टेभरे, चालक पोशि आकाश पवार यांनी केली. पुढील तपास पोहेको संदिप ठाकुर करीत आहे.

Post a Comment

0 Comments