यवतमाळात युवकाचा खून


यवतमाळ : शहरातील लोहारा एमआयडीसी परिसरात धारदार शस्त्राने वार करून एका युवकाचा खून करण्यात आला. आज दिनांक १० मार्च रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी लोहारा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला आहे.  

विनोद शिपलेकर (वय अंदाजे २५, रा. कोलाम पोड लोहारा) असे मृतकाचे नाव आहे. तो एमआयडीसी मध्ये मजुर म्हणून काम करीत होता. अज्ञात मारेकर-यांनी धारदार शस्त्राने वार करुन विनोदचा खून केला. आज सोमवार  दिनांक १० मार्च रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच लोहारा पोलीस स्टेशनच्या ठाणेदार यशोधरा मुनेश्‍वर व अन्य पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. विनोदचा खून कोण व का केला हे वृत्त लिहेपर्यंत समजु शकले नाही.

एसपींनी दिली घटनास्थळी भेट

लोहारा एमआयडीसी परिसरात विनोद शिपलेकर या युवकाचा खून झाला. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधिक्षक पियूष जगताप, उपविभागीय पोलीय अधिकारी दिनेश बैसाणे यांच्यासह एलसीबीचे अधिकारी व कर्मचा-यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.  

Post a Comment

0 Comments