‘ऐतिहासिक स्त्रियांनाला मानवंदना’ माहितीपटाचे प्रदर्शन

 जागतिक महिला दिन : सामाजिक क्षेत्रात  कार्य करणा-या स्त्रियांचा सत्कार

यवतमाळ : आधार सोशल हेल्थकेअर फाउंडेशन कडून जागतिक महिला दिनानिमित्त ऐतिहासिक स्त्रियांना मानवंदना या दादासाहेब फाळके चित्रपट युनियन माहितीपटाचे प्रदर्शन सेंट्रल सेलिब्रेशन  हॉल मेडिकल चौक यवतमाळ येथे झाले.

या माहितीपटाचे दिग्दर्शन लेखन संकल्पना डॉक्टर अंजली गवारले यांची आहे. झाशी राणी सावित्रीबाई, जिजामाता, सावित्रीआई फुले अहिल्यादेवी होळकर, राणी दुर्गावती, रमाबाई आंबेडकर या स्त्रियांची पात्र डॉक्टर अंजली गवारले, पुनम शेंडे, वर्षा मानवतकर, वर्षा पडवे, संगीता पवार यांनी आकारले आहे. ध्वनी, मृणालिनी दहीकर यांचा तर सिनेमॅटोग्राफी भवानी स्टुडिओ अँड  फिल्म, डबिंग जिम्मी  स्टुडिओ यवतमाळची आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्पना मांगोळकर ह्या होत्या. तर विशेष अतिथी अर्चना माळवी, शैलाताई मिर्झापुरे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला  बेताब यांनी शायरी केली. यशस्वीतेसाठी रोहिणी ढोले, पल्लवी कांबळे, करुणा धनेवार, स्वप्नाली चौधरी, संगीता भांडेकर, सिद्धार्थ मानकर, इशू साळवे यांनी सहकार्य केले.

१८ महिलांचा सत्कार

डॉ. अंजली गवारले, अध्यक्ष आधार फाउंडेशन कडून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणा-या १८ स्त्रियांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती संगीता पवार, उज्वला मानकर, प्रणाली धम्मानंद, पपीता येसू, इशू माळवे, सामाजिक क्षेत्रा अग्रेसर असणा-या  अलका कोथळे, भावना लेडे, सुनीता भितकर, स्मिता बोबडे, वर्षा चौधरी, डॉ. मंगला निकम, डॉ. कविता बोरकर, वर्षा पडवे, शुभांगी सोनटक्के , पुनम शेंडे, वर्षा मानवतकर, मृणालिनी दहीकर, सोनाली देशमुख, वर्षा मोकासे यांचा समावेश आहे,

सामाजिक क्षेत्रातील अनेकांचा सत्कार 

आनंद  कसंबे यांचा दादासाहेब फाळके चित्रपट युनियन कडून शाल ,श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. अमित राऊत काजू चित्रपटासाठी, विजय पांडे डान्स कोरिओग्राफर कलाक्षेत्र साठी, दीपक लोखंडे यांचा सिनेमॅटोग्राफीसाठी, तसेच नरेंद्र पवार, तुषार देशमुख, जीतेश नवाडे, धर्मेंद्र मानवतकर, भगवान भितकर यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी सत्कार करण्यात आला.

 


Post a Comment

0 Comments