पोलीस ठाण्यातून आरोपी पसार

यवतमाळ : विविध कलमान्वये गुन्हे दाखल असलेल्या एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. वैद्यकीय तपासणी करुन पोलीस ठाण्यात परत आणल्यानंतर आरोपी तेथून पसार झाला. ही घटना १० मार्च रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास पांढरकवडा पोलीस ठाण्यात घडली.
 दि १० मार्च रोजी एका आरोपीला पांढरकवडा पोलीस कर्मचारी ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हे दाखल आहेत. काल सुद्धा एका गुन्हामध्ये त्याला ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथे वैद्यकीय तपासणी साठी नेण्यात आले. त्यांनतर आरोपीला पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आले. त्याला लाॅकअप मध्ये टाकण्याच्या आधीच आरोपी परिसरातूनच पसार झाला. पांढरकवडा येथील पोलीस कर्मचा-याच्या हलगर्जीपणामुळे आरोपी पसार झाल्याची चर्चा आहे. आरोपी हा पोलीस स्टेशनाच्या मागच्या बाजुने अंधाराचा फायदा घेत पळून गेला. या बाबतची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीची शोध मोहीम राबविली मात्र अजुनही त्याचा थांगपत्ता लागला नाही. सदर आरोपी कुठे आढळून आल्यास पोलिसांना याबाबत माहिती द्यावी असे आवाहन पांढरकवडा पोलिसांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments